मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Methi Puri Recipe: नाश्त्यात बनवा खुसखुशीत मेथी पुरी, नोट करा रेसिपी!

Methi Puri Recipe: नाश्त्यात बनवा खुसखुशीत मेथी पुरी, नोट करा रेसिपी!

Feb 03, 2024 09:58 AM IST

Breakfast Recipe: जर तुम्हाला हिवाळ्यात मेथीची भाजी आणि पराठे खाण्याचा कंटाळा आला असेल तर एकदा नक्की कुरकुरीत मेथी पुरी करून पहा.

how to Make crispy methi puri
how to Make crispy methi puri (freepik)

Winter Recipe: हिवाळ्यात भरपूर प्रमाणात हिरव्या भाज्या बाजारात दाखल होतात. मेथीची भाजी तर सहज उपलब्ध होते. अशावेळी सगळेच या भाजीचा पुरेपूर आस्वाद घेतात. सहसा मेथीची भाजी किंवा पराठे बनवले जातात. पण तुम्ही कधी मेथीची पुरी (Methi Poori Recipe) खाल्ली आहे का? होय मेथीपासून मसालेदार आणि कुरकुरीत पुरी बनवता येते. तुम्ही तुम्ही मेथीची खस्ता पुरी बनवून नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणात खाऊ शकता. मेथीपुरीची चव अशी आहे की ती भाजीशिवाय आणि नुसती चहासोबतही खाता येते. सध्या हिवाळ्यात हिरव्या मेथीचा हंगाम आहे, याचा फायदा घेऊन तुम्ही खुसखुशीत मेथीपुरी बनवून खाऊ शकता. चला जाणून घ्या (how to Make crispy methi puri) क्रिस्पी मेथी पुरी बनवण्याची रेसिपी.

कशी बनवायची मेथी पुरी?

> मेथी पुरी बनवण्यासाठी तुम्हाला फक्त २५० ग्रॅम मेथीची पाने घ्यावी.

> आता मेथीची पाने ३-४ वेळा धुवून कापून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

> मेथी कापल्यानंतर थोडी चिरलेली कोथिंबीर त्यात घाला.

> मेथीमध्ये मीठ घाला बाजूला ठेवा.

Pohe ka Pakoda: सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा पोहे पकोडे, जाणून घ्या रेसिपी!

> आता मिक्सरच्या भांड्यात अर्धा चमचा जिरे, १ टीस्पून बडीशेप घाला.

> २ इंच आले, २ हिरव्या मिरच्या आणि १ टोमॅटो घालून बारीक करा.

> पीठ मळताना हा खास मसाला मिसळवा.

> आता मीठ घातलेल्या मेथीमध्ये वाटलेला मसाला मिसळा.

> त्यात १ कप मैदा आणि सुमारे २ चमचे बेसन घाला.

> तसेच २ चमचे तांदळाचे पीठ किंवा बारीक रवा मिसळा.

> अर्धा चमचा तिखट आणि अर्धा चमचा हळद घाला.

> मैद्यामध्ये १ चमचा धनेपूड आणि थोडी हिंग घाला.

> तसेच अर्धा चमचा ओवा आणि १ चमचे पांढरे तीळ घाला.

> सर्वकाही चांगले मिसळा आणि मोईन घाला.

> मळण्यासाठी २ चमचे तेल किंवा तूप वापरा.

Moong Dal Halwa Recipe: १५ मिनिटांत तयार करा मूग डाळीचा हलवा, नोट करा रेसिपी!

> आता आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट पीठ बनवा.

> पुरी लगेच बनवायची असेल तर पीठ चांगले मळून घ्या.

> पिठाचा मध्यम आकाराचा गोळा तयार करून हलके तेल लावून लाटून घ्या.

> सर्व पुऱ्या मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel