Testy Breakfast Recipe: नाश्त्यात काही तरी वेगळं हवं असतं. हिवाळ्यात (Winter Breakfast Recipe) सकाळी चटपटीत काही तरी खावेसे वाटते. अशावेळी अनेकदा पकोडे बनवले जातात. आता तुम्ही म्हणाल, यात नवीन काय आहे, हे तर आपण नेहमी खातो. पण आम्ही तुमच्यासाठी हटके रेसिपी घेऊन आलो आहोत. कांदा, मूग डाळ किंवा कॉर्नचे नसून पोह्यांचे पकोडे (Pohe ka Pakoda) बनवू शकता. या रेसिपीचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे हे तयार होण्यास जास्त वेळ लागत नाही. सकाळच्या घाईत ही डिश पटकन बनू शकते. याची चवही वेगळी आहे. पोहे पकोडे कसे बनवायचे हे माहित नाही ना? या लेखाच्या माध्यमातून जाणून घ्या पोहे पकोडेची रेसिपी.
१ कप पोहे
२ उकडलेले बटाटे
१ कांदा बारीक चिरून
१ कप बेसन
तेल
बारीक चिरलेली हिरवी मिरची
चाट मसाला
चवीनुसार मीठ
भाजलेले शेंगदाणे
पोहे पकोडे बनवण्यासाठी प्रथम पोहे एका भांड्यात घेऊन नीट धुवून घ्या आणि बाजूला ठेवा. आता उकडलेला बटाटा घेऊन मॅश करा. त्यानंतर पोह्यात उकडलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, भाजलेले शेंगदाणे, चाट मसाला, चवीनुसार मीठ घाला. त्यानंतर त्यात बेसनाचे द्रावण टाकावे. पकोड्याचे मिश्रण तयार आहे. आता गॅस चालू करा आणि त्यावर तवा ठेवा. तवा गरम झाल्यावर त्यात तेल घाला. आता पकोडे गोल आकारात बनवून गरम तेलात टाका. गॅसची आंच थोडी कमी करा म्हणजे पकोडे व्यवस्थित शिजतील. ते शिजल्यावर ताटात काढा आणि हिरव्या कोथिंबीरीच्या चटणीसोबत गरमागरम पकोड्यांचा आस्वाद घ्या.