मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Bread Upma Recipe: सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी बनवा ब्रेड उपमा, नोट करा रेसिपी!

Bread Upma Recipe: सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी बनवा ब्रेड उपमा, नोट करा रेसिपी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Mar 29, 2024 09:35 AM IST

Breakfast Recipe: सकाळच्या घाईगडबडीत नाश्ता बनवणे हा टास्क असतो. अशावेळी झटपट तयार होणारी ही रेसिपी ट्राय करा.

how to make bread upma
how to make bread upma (freepik)

Healthy Brekfast Recipe: नाश्ता करणे गरजेचे आहे. दिवसाची सुरुवात निरोगी सुरुवात करण्यासाठी नाश्ता आवश्यक आहे. हे मेंदूला ऊर्जा प्रदान करते. यामुळे आपण फास्ट फास्ट काम करू शकता. जर तुम्ही नाश्ता करत नसाल तर हे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवते. नाश्ता न केल्यास तुम्हाला गॅसची समस्या निर्माण होऊ शकते. नाश्ता न केल्यास दिवसभर काम करावेसे वाटत नाही आणि नंतर सुस्ती कायम राहते. अशा परिस्थितीत, आपण जितका वेळ मिळेल तितक्यात नाश्ता तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.अशा परिस्थितीत तुम्हाला झटपट तयार होणाऱ्या रेसिपी जाणून घेयला पाहिजे. अशीच एक रेसिपी म्हणजे ब्रेड उपमा. ब्रेड उपमा बनवायला जास्त वेळ लागत नाही. जाणून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी.

जाणून घ्या रेसिपी

> ब्रेड उपमा बनवण्यासाठी प्रथम कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो आणि नंतर सिमला मिरची चिरून घ्या.

> एका पॅनमध्ये थोडे तेल आणि मोहरी टाकायची आहे.

Bread Pakoda Recipe: विकेंडला नाश्त्यात बनवा ब्रेड पकोडे, झटपट तयार होईल रेसिपी!

> चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि नंतर सिमला मिरची घाला.

> हलकेच मसाले घालून सर्व काही तळून घ्या. थोडे मीठ घालून शिजवा.

> ब्रेडचे तुकडे करून वरून तूप घालून तळून घ्या.

> नंतर त्यात थोडे पाणी टाका आणि शिजवत रहा.

ही रेसिपी पण बघा ट्राय करून

तुम्ही ब्रेड उपमा ऐवजी पोहा उपमा किंवा ओट्स उपमा देखील बनवू शकता. याशिवाय तुम्ही नाश्त्यासाठी ब्रेड सँडविच आणि विविध प्रकारच्या डिशेसही बनवू शकता. त्याची चव वाढवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरू शकता. या सर्व गोष्टींमुळे अन्नातील फायबरचे प्रमाण वाढते आणि पोट जास्त काळ भरलेले राहते. तर, ही नाश्त्याची रेसिपी कधीतरी करून पहा.

WhatsApp channel

विभाग