Sugar intake and liver disease relation: १९ एप्रिल रोजी पूर्ण जगभरात जागतिक लिवर डे साजरा केला जातो. वर्ल्ड हेल्थ ओर्गनायझेशन ने यकृताच्या आजारवर प्रकाश टाकण्यासाठी व त्यावर आणखी संशोधन करून सक्षम करण्यासाठी हा दिवस सुरू केला आहे. आज आपण सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल मुंबई चे डॉ. आकाश शुक्ला, (डायरेक्टर, हीपॅटोलॉजी) यांच्याकडून जाणून घेऊ की साखरेचे सेवन आणि यकृताचे आजार यांचा एकमेकांशी नक्की कसा संबंध येतो. जास्त साखर खाल्ल्याने आरोग्यावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांची तुम्हाला जाणीव असेल.
जास्त साखरेचे सेवन लठ्ठपणा, टाईप २ मधुमेह आणि हृदयविकार आणि काही कर्करोगांसह अनेक जुनाट आजारांच्या वाढीव जोखमीशी संबंधित आहे. दररोज साखर-गोड पेये प्यायल्याने यकृताचा कर्करोग आणि दीर्घकालीन यकृत रोग होण्याचा धोका देखील वाढू शकतो.
कॉर्न सिरप किंवा फळे यांसारख्या गोड असणाऱ्या घटकांमध्ये आढळणाऱ्या सामान्य स्रोतांमधून मिळणारे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या दोन्ही स्वरूपात साखरेचा वापर जास्त प्रमाणात केल्यास यकृत खराब होऊ शकते कारण या साखरेचे कालांतराने यकृतातील चरबीमध्ये रूपांतर होते, ज्यामुळे फॅटी यकृत ज्यात यकृतमद्धे चरबीचे प्रमाण वाढते आणि यकृताच्या रोगाशी संबंधित चयापचय बिघडणे यासारख्या परिस्थितींमध्ये योगदान होते. हे चयापचय बिघडलेले कार्य केवळ यकृताच्या समस्यांनाच वाढवत नाही तर इन्सुलिन प्रतिरोध, मधुमेह, स्लीप एपनिया आणि हायपरडिस्लिपिडेमिया यांसारख्या संबंधित परिस्थिती विकसित होण्याचा धोका देखील वाढवते.
जास्त साखरेचे सेवन केल्याने विविध प्रकारचे यकृताचे आजार होऊ शकतात, ज्यामध्ये फॅटी लिव्हर रोग सर्वात सामान्य आहे. तसेच हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस सी किंवा अल्कोहोल-संबंधित यकृत आजार सूद्धा होऊ शकतात.
जागतिक स्तरावर यकृताचे आजार हे आरोग्यासाठी एक मोठे ओझे आहे. गेल्या दशकातील आकडेवारी पाहिल्यास भारतातही यकृताच्या आजारांचा धोका आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या घटनांमध्ये वर्षानुवर्षे वाढ होत असल्याचे स्पष्ट होते. जीवनशैली आणि आहारातील गडबडीमुळे तरुण-तरुणीही यकृताच्या आजारांना बळी पडत आहेत, त्यामुळे आरोग्य क्षेत्रावर अतिरिक्त ताण तर वाढत आहेच, पण यकृताच्या आजारांमुळे मृत्यूच्या घटनाही वाढत आहेत.
संबंधित बातम्या