मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Benefits: चिया सीड्स की तुळशीच्या बिया, वजन कमी करण्यासाठी काय आहे जास्त फायदेशीर?

Health Benefits: चिया सीड्स की तुळशीच्या बिया, वजन कमी करण्यासाठी काय आहे जास्त फायदेशीर?

Hiral Shriram Gawande HT Marathi
Dec 20, 2023 04:41 PM IST

Chia Seeds Vs Basil Seeds: चिया सीड्स आणि तुळशीच्या बिया या दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पण वजन कमी करण्यासाठी यापैकी कोणते जास्त फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

चिया सीड्स आणि तुळशीच्या बिया
चिया सीड्स आणि तुळशीच्या बिया

Chia Seeds and Basil seeds for Weight Loss: निरोगी आणि फिट शरीर कोणाला नको असते? यासाठी लोक जिममध्ये व्यायाम करणे, डायटिंग करणे, घरगुती उपाय या गोष्टी करतात. एवढे करूनही अनेकदा अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी चिया सीड्स आणि तुळशीच्या बियांचे सेवन करतात. या दोन्ही बिया अत्यंत पौष्टिक आहेत आणि त्यांच्या आरोग्य फायद्यांसाठी ओळखल्या जातात. चिया सीड्स आणि तुळशीच्या बिया रोगप्रतिकारक शक्ती वाढवून वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. विविध पोषक घटकांनी समृद्ध या दोन्ही बियांपैकी वजन कमी करण्यासाठी कोणते जास्त चांगले आहे? जाणून घ्या सविस्तर

ट्रेंडिंग न्यूज

चिया सीड्समध्ये असलेले पोषक घटक

चिया सीड्समध्ये ६ टक्के पाणी, ४६ टक्के कार्बोहायड्रेट, ३४ टक्के फॅट आणि १९ टक्के प्रथिने असतात. याशिवाय यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स असतात जे शरीराला फ्री रॅडिकल्समुळे नुकसान होण्यापासून वाचवतात. चिया सीड्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे वजन कमी करण्यास मदत करते. वास्तविक फायबरचे सेवन केल्याने भूक कमी होते. त्यामुळे आपण कमी प्रमाणात खातो आणि वजन हळूहळू कमी होऊ लागते. याशिवाय चिया सीड्समध्ये कॅलरी नसतात आणि ते ग्लूटेन-फ्री असते. त्यामुळे वजन वाढत नाही, ते नियंत्रणात राहते.

तुळशीच्या बियांमध्ये असलेले पोषक तत्वे

तुळशीच्या बियांमध्ये म्हणजे ३ ग्रॅम सब्जामध्ये २ ग्रॅम प्रथिने, ७ ग्रॅम कार्बोहायड्रेट, २.५ ग्रॅम फॅट आणि १२४० मिलीग्राम ओमेगा ३ असते. तुळशीमध्ये कॅलरीज आणि फॅट अजिबात नसते. त्यामुळे याच्या सेवनाने वजन वाढत नाही आणि हळूहळू वजन कमी होते. याशिवाय तुळशीच्या बियांमध्ये फायबर देखील चांगले असते. फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने भूक कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते. जेवण करण्यापूर्वी याचे पाणी प्यायल्यास जास्त प्रमाणात अन्न खाल्ले जात नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

आरोग्यासाठी फायदेशीर

चीया सीड्स आणि सब्जा हे दोन्ही विविध पोषक तत्त्वांनी समृद्ध असल्यामुळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. चिया सीड्स हे मेंदू, हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असून, ते शरीरातील जळजळ कमी करते. तर लोहाचा चांगला स्त्रोत असलेले तुळशीच्या बिया लाल रक्तपेशी तयार करण्यास, शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करते. या दोन्ही बिया बद्धकोष्ठतेची समस्या दूर करून पचन क्षमता सुधारते. शिवाय या दोन्ही बिया कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

चिया सीड्स आणि तुळशीच्या बियांमध्ये काय फरक आहे?

तुळशीच्या बिया काळ्या, लहान आणि गोल असतात. दुसरीकडे चिया सीड्स थोड्या मोठ्या, आकारात अधिक अंडाकृती असतात आणि अनेक रंगात येतात.

 

चिया सीड्स की तुळशीच्या बिया

चिया सीड्स आणि तुळशीच्या बियांमध्ये जवळजवळ समान पोषक तत्वे आढळतात. चिया सीड्स आणि तुळशीच्या बिया दोन्ही आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहेत. दोन्हीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे पोट भरलेले वाटते. त्यामुळे या दोन्हीमुळे वजन कमी होते, असे मानले जाते. अभ्यासात असे आढळून आले आहे की चिया सीड्स वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. तुळशीच्या बियांच्या फायद्यांबाबत काही मर्यादित अभ्यासच उपलब्ध आहेत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग