मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Healthy Food For Kids: रिकाम्या पोटी मुलांना द्या हे ५ आरोग्यदायी पदार्थ, आजारांपासून राहतील दूर!

Healthy Food For Kids: रिकाम्या पोटी मुलांना द्या हे ५ आरोग्यदायी पदार्थ, आजारांपासून राहतील दूर!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 23, 2024 09:57 AM IST

Parenting Tips: मुलं आजारी पडू नयेत म्हणून त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

5 healthy foods for children
5 healthy foods for children (freepik)

Breakfast for Children: प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपलं मुलं सुदृढ व्हावे. आपल्या मुलाने प्रत्येक गोष्टीत पुढे राहावे आणि त्यांचा मेंदू खूप कुशाग्र असावे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत व्हावे असे सगळ्याचं पालकांना वाटतं. यासाठी पालक मुलांसाठी सगळं करायला तयार असतात. लक्षात घ्या आरोग्यासाठी आणि मानसिक विकासासाठी चांगला आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. मुलांचे आरोग्य त्यांच्या आहारावर अवलंबून असते. तुम्ही तुमच्या मुलांना काही गोष्टी रिकाम्या पोटी खायला द्याव्यात, जेणेकरून ते नेहमी हेल्दी राहतील.

हे पदार्थ रिकाम्या पोटी खायला द्या

> मुलांना तंदुरुस्त राहण्यासाठी मुलांना रिकाम्या पोटी बदाम खायला द्या. यामधील जीवनसत्त्वे, खनिजे मुलांसाठी उपयुक्त ठरतात. यामुळे शरीर मजबूत होते.

Parenting Tips: या सवयी मुलांच्या १० वर्षाच्या आतमध्ये लावा, मिळतील अनेक फायदे!

> तुमच्या मुलांनाही दररोज सफरचंद खाण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. मुलांची दृष्टी सुधारण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. सफरचंदात कॅल्शियम, लोह आणि जस्त चांगल्या प्रमाणात असते.

> मुलांनी रोज सकाळी उठल्यावर खाली पोट कोमट पाणी प्यायला द्यावे. यामुळे मुलांचे शरीर आतून पूर्णपणे तंदुरुस्त राहते.

Parenting Tips: या ४ गोष्टी मुलांना कधीही सांगू नका, नाहीतर ते बनतील हट्टी आणि भित्रे!

> पोटाच्या सर्व समस्या दूर ठेवण्यासाठी रिकाम्या पोटी केळी मुलांना खायला द्या.

> प्रथिनांसाठी डाळ सर्वोत्तम मानला जाते. डाळीच्या पाण्यातही पुरेशा प्रमाणात प्रथिने आढळतात. वजन कमी करण्यासाठी देखील हे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे मुलांना डाळ आवर्जून खायला द्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel