मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Parenting Tips: या ४ गोष्टी मुलांना कधीही सांगू नका, नाहीतर ते बनतील हट्टी आणि भित्रे!

Parenting Tips: या ४ गोष्टी मुलांना कधीही सांगू नका, नाहीतर ते बनतील हट्टी आणि भित्रे!

Dec 21, 2023 12:02 AM IST

Bad Parenting: काही गोष्टीचा मुलांच्या कोमल मनावर खोलवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्याशी काही गोष्टी बोलताना काळजी घेणे गरजेचे आहे.

Never tell your kids these 4 things
Never tell your kids these 4 things (Freepik)

Things parents should not say to children: लहान मुलांशी आपण बाकी मोठ्या लोकांशी वागतो तसं वागू शकत नाही. लहान मुलांचे गाईड हे त्यांचे पालक असतात. पालक मुलांना जे शिकवतात जसे वागतात तसेच ते वागतात. अनेकदा असेही होते की पालक म्हणून आपण खूप चुका करतो आणि तेही ठीक आहे. कारण पालक होण्यासाठी खूप काही शिकावे लागते. मुलांशी कसे बोलावे हे अनेकदा समजत नाही. आपण अनेकदा मुलांशी बोलताना असे काही बोलतो ज्यामुळे मुलांना चुकीचा संदेश मिळतो. बोलता बोलता त्यांच्या बोलण्याचा मुलांच्या कोमल मनावर काय परिणाम होईल हे पालकांना कळत नाही. खरं तर या गोष्टींमुळे मुले हळूहळू हट्टी होऊ लागतात आणि त्यांचा आत्मविश्वासही कमी होऊ लागतो. हे असं होऊ नये यासाठी कोणत्या गोष्टी मुलांना बोलणे टाळणे पाहिजे हे लक्षात घेणे गरजेचं आहे.

त्यांच्या मुलाकडे पहा

प्रत्येक मुलाचा स्वभाव वेगळा असतो हे लक्षात घ्या. याच कारणामुळे इतर मुलांशी आपल्या मुलाची तुलना करू नका. कारण असं केल्याने त्याचा आत्मविश्वास कमी होणार. त्यामुळे अशी तुलना करू नकात.

रडू नको

मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करणे महत्वाचे आहे. पण याउलट अनेक पालक मुलांना रडूही देत नाहीत. मुलांना रडू नका असे सांगू नका. कारण यामुळे त्याच्या भावना आत राहतील आणि त्यांना गुदमरल्यासारखे वाटेल. त्यांच्या भावना त्यांना दाबायला न शिकवता. एक्स्प्रेस करायला शिकवा.

ट्रेंडिंग न्यूज

मला तुझी लाज वाटते

मला तुझी लाज वाटते हे वाक्य आपल्या मुलाला चुकूनही बोलू नका. मुलाला दुखावण्याचा त्यांचा अजिबात हेतू नसतो पण नकळत या वाक्यातून ते दुखावले जातात. ही गोष्ट मुलांच्या मनात घर करून राहू शकते. त्यामुळे त्यांच्याशी असे बोलू नका. मूल ते कधीही व्यक्त करू शकत नाही, परंतु त्याचा आत्मविश्वास आणि मनोबल कमकुवत होते. आपल्या आई-वडिलांच्या जीवनात आपले महत्त्व नाही असा गैरसमज मुलाचा असू शकतो. तो हट्टी होऊ शकतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel