मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  पपईच्या बिया फेकण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे फायदे, 'या' आजारांमध्ये मिळेल आराम

पपईच्या बिया फेकण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे फायदे, 'या' आजारांमध्ये मिळेल आराम

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 20, 2023 09:28 PM IST

Health Tips: पपई प्रमाणेच त्याचे बिया देखील गुणांचे भांडार आहेत. पपईच्या बिया खाल्ल्याने पीरियड क्रॅम्प्सपासून शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

पपईच्या बियांचे फायदे
पपईच्या बियांचे फायदे (unsplash)

Health Benefits of Papaya Seeds: पपई हे असे फळ आहे जे अनेक गुणांचे भांडार आहे. हे कच्चे किंवा शिजवून खाता येते. हे खाल्ल्याने त्वचेला आणि आरोग्यालाही फायदा होतो. लोकांना पपईची गोड चव आवडते. मात्र जेव्हाही आपण पपई खातो तेव्हा त्याच्या काळ्या बिया फेकून देतो. पण या काळ्या बियांचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही त्यांना फेकून देण्याची चूक कधीच करणार नाही. पपई प्रमाणेच याच्या बिया देखील गुणांचे भांडार असून, ते औषधापेक्षा कमी नाही. विशेषत: महिलांसाठी पपईच्या बियांमध्ये आश्चर्यकारक फायदे लपलेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया पपईच्या बियांचे फायदे.

ट्रेंडिंग न्यूज

पपईच्या बियांमध्ये असतात हे पौष्टिक घटक

पपई प्रमाणेच याच्या बिया देखील अनेक फायद्यांनी परिपूर्ण आहेत. यामध्ये भरपूर फायबर, प्रोटीन असते. दुसरीकडे, जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम, फॉस्फरस समृध्द असलेल्या पपईमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असतात. या काळ्या-तपकिरी रंगाच्या बियांची चव तुरट असते. जे वाळवून पावडरमध्ये बारीक करून खाल्ल्या जाते.

वजन कमी करण्यास मदत

पपईच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते, जे पचनास मदत करते. याचे सेवन केल्याने शरीरातील टाकाऊ पदार्थ सहज शरीरातून बाहेर पडतात. पपईच्या बिया चयापचय प्रणाली योग्य ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही.

मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम

पपईच्या बियांमध्ये आढळणारे कॅरोटीन शरीरातील इस्ट्रोजन हार्मोन्स नियंत्रित करते. यासोबतच मासिक पाळी नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. या बिया खाल्ल्याने मासिक पाळीच्या दुखण्यामध्ये आराम मिळतो.

कोलेस्ट्रॉल कमी करते

पपईच्या बिया खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल योग्य राहण्यास मदत होते. यामध्ये आढळणारे मोनोसॅच्युरेटेड अॅसिड खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

आतडे निरोगी राहते

पपईप्रमाणेच त्याच्या बिया खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते. आतड्यांमध्ये आढळणारे हानिकारक कीटक आणि बॅक्टेरिया नष्ट करते आणि योग्य मोशन क्रिया करण्यास मदत करते.

या आजारांमध्ये मिळतो आराम

पपईच्या बिया खाल्ल्याने इंफ्लेमेशनमध्ये आराम मिळतो. तर कर्करोगाचा धोका कमी होतो. त्यात पॉलीफेनॉल अँटी ऑक्सिडंट असते. ज्यामुळे अनेक प्रकारच्या जोखमीचा धोका कमी होण्यास मदत होते.

कशा खाव्यात पपईच्या बिया

पपईच्या बिया खाण्यासाठी या बिया उन्हात वाळवून बारीक करा. हवाबंद डब्यात ठेवा आणि रोज खा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग