Health Tips: बदामने आटोक्यात येईल लठ्ठपणा आणि मधुमेह, जाणून घ्या कसे खावे
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips: बदामने आटोक्यात येईल लठ्ठपणा आणि मधुमेह, जाणून घ्या कसे खावे

Health Tips: बदामने आटोक्यात येईल लठ्ठपणा आणि मधुमेह, जाणून घ्या कसे खावे

Feb 18, 2023 06:19 PM IST

Benefits of Almonds: बदाम खाल्ल्याने केवळ बुद्धीच तल्लख होत नाही तर वजन, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ही बाब सिद्ध झाली आहे. येथे जाणून घ्या तुम्हाला किती बदाम आणि कसे खायचे आहेत.

बदाम खाण्याचे फायदे
बदाम खाण्याचे फायदे (unsplash)

Almonds to Control Weight and Blood Sugar: बदाम खाण्याचे फायदे तुम्ही अनेकदा वाचले आणि ऐकले असतील. आता एका ताज्या अभ्यासानंतर असा दावा करण्यात आला आहे की रोज बदाम खाल्ल्याने लठ्ठपणा आणि रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. फ्रंटियर्स इन न्यूट्रिशन जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळून आले की १२ आठवडे दररोज बदाम खाल्ल्याने इंसुलिन प्रतिरोधक क्षमता कमी होते, पॅनक्रियाजची क्रिया सुधारते आणि रक्तातील साखर राखण्यास मदत होते. संशोधकांनी दावा केला की ज्या गटाला बदाम देण्यात आले होते त्यांचे वजन, बॉडी मास इंडेक्स आणि कंबरेची रुंदी कमी झाली होती. एवढेच नाही तर कोलेस्ट्रॉलही कमी झाले.

वजन आणि शुगर दोन्ही सुधारते

बदाम खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो, हे तुम्ही घरातील मोठ्यांकडून अनेकदा ऐकले असेल. आता चेन्नईच्या मद्रास डायबिटीज रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष आणि प्रमुख विश्वनाथन मोहन म्हणतात की, बदाम खाणाऱ्या लोकांमध्ये वजन आणि शुगर दोन्ही मध्ये सुधारणा दिसून आली. मोहन यांनी एका स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, लठ्ठपणा ही जगभरात दिसून येणारी आरोग्य समस्या आहे आणि आम्हाला माहित आहे की लठ्ठपणामुळे टाइप २ मधुमेहासारख्या आजारांचा धोका वाढतो. आपल्याला हे देखील माहित आहे की ही एक जटिल समस्या आहे, जी मधुमेहाशी संबंधित आहे आणि आम्हाला वाटते की आम्हाला एक सोपा उपाय सापडला आहे.

कोलेस्ट्रॉलमध्येही फायदा होतो

संशोधकांना असेही आढळून आले की ज्या लोकांनी बदाम खाल्ले त्यांच्यामध्ये एकूण कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण चांगले होते. लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी दोन्ही चांगले आहेत. हा अभ्यास २५ ते ६५ वयोगटातील ४०० लोकांवर करण्यात आला, ज्यांचा बॉडी मास इंडेक्स २३ किलोग्राम प्रति चौरस मीटर (किलोग्राम/एम२) पेक्षा जास्त होता.

कसे खावेत बदाम

तज्ञांचे म्हणणे आहे की, रोज ६ ते ८ बदाम खाणे सुरक्षित आहे. तुम्ही ४ बदामांनी सुरुवात करू शकता. रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी साल काढून खाणे बेस्ट आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner