मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Down Syndrome Day: उशिरा लग्न झाल्यास बाळामध्ये असतो या सिंड्रोमचा धोका

World Down Syndrome Day: उशिरा लग्न झाल्यास बाळामध्ये असतो या सिंड्रोमचा धोका

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 21, 2023 11:46 AM IST

तुम्ही मानसिक विकास न झालेली मुलं बघितली असतील. ही डाउन सिंड्रोम आजाराने ग्रस्त असतात. आज जागतिक डाउन सिंड्रोम दिनानिमित्त याबद्दल जाणून घेऊया.

जागतिक डाउन सिंड्रोम दिन
जागतिक डाउन सिंड्रोम दिन (HT)

World Down Syndrome Day: धावपळीच्या जीवनात तरुणांमध्ये करिअर सेट करण्याची क्रेझ वाढली आहे. करिअरच्या नादात तरुणाई लग्नाला प्राधान्य देत नाहीये. तरुणांच्या उशिरा लग्नामुळे नवजात शिशू डाउन सिंड्रोमचे बळी ठरत आहेत. या आजारात मुलाचा मानसिक विकास त्याच वयाच्या मुलांपेक्षा खूपच कमी होतो. निरागस दिसणारा, गुबगुबीत, सपाट चेहरा, तिरके डोळे, लहान आणि रुंद पापण्या, लहान बोटे आणि पायाचे सपाट तळवे असे हे मुलं दिसतात. बालरोगतज्ज्ञांनी सांगितले की, या आजाराने बळी पडलेल्या मुलांचे स्नायू सैल आणि कमकुवत असतात. अशा मुलांना संगीत आणि नृत्याची विशेष ओढ असते. ते गाण्याचे सूर ऐकून ते उत्स्फूर्तपणे नाचू लागतात.

ट्रेंडिंग न्यूज

एका अतिरिक्त क्रोमोसोममुळे होतो हा आजार

हा आजार आईच्या पोटातच नवजात बालकाला होतो. प्रत्येक ६०० बालकांपैकी एक या आजाराचा बळी आहे. ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांच्या ५० पैकी एका बाळामध्ये हा आजार आढळतो. डाऊन सिंड्रोम शरीरातील क्रोमोसोमच्या म्हणजेच गुणसूत्रांच्या असामान्य संख्येमुळे होतो. साधारणपणे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात ४६ गुणसूत्र असतात. यापैकी २३ गुणसूत्रे आईकडून आणि २३ गुणसूत्रे वडिलांकडून येतात. डाऊन सिंड्रोम ग्रस्त नवजात ४७ गुणसूत्रांसह येते. गुणसूत्रांची अतिरिक्त जोडी शरीर आणि मेंदूच्या विकासावर परिणाम करते. बहुतेक प्रकरणांमध्ये संततीला आईच्या जनुकांमधून अतिरिक्त गुणसूत्र वारशाने मिळते. अतिरिक्त गुणसूत्रांना ट्रायसोमी २१ म्हणतात. डाउन सिंड्रोम असलेल्या ९६% रुग्णांमध्ये ट्रायसोमी २१ आढळते. याशिवाय ट्रान्सलोकेशन डाउन सिंड्रोम आणि मोझॅक डाउन सिंड्रोम देखील आहे.

उशिरा आढळून आल्याने अडचणी वाढतात

डाउन सिंड्रोममुळे बालकांमध्ये अनेक प्रकारचे आजार होतात. अशा परिस्थितीत पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. अशा मुलांना पालकांचे विशेष निरीक्षण आवश्यक असते. मानसिक आजारासोबतच मुलाला हृदय आणि श्वसनाचा त्रास होऊ शकतो. वेळेत रोग ओळखा आणि डॉक्टरांकडून उपचार घ्या. तुमच्या हृदयाची वेळोवेळी तपासणी करत राहा. या मुलांना संगीताची आवड असते. गाडीचा हॉर्न ऐकून ते रस्त्याकडे धावू लागतात. अशा परिस्थितीत ते अपघाताचे बळी ठरतात.

डाऊन सिंड्रोमची चिन्हे

- सपाट चेहरा, विशेषत: नाकाचे सपाट टोक

- वरच्या बाजूने तिरके डोळे

- लहान मान आणि लहान कान

- तोंडाच्या बाहेर जीभ निघत राहते

- स्नायू कमकुवत, सैल सांधे आणि जास्त लवचिकता

- रुंद, लहान हात, तळहातावर एक रेषा

- तुलनेने लहान बोटे, लहान हात आणि पाय

- कमी उंची

- डोळ्याच्या बुबुळात लहान पांढरे डाग

डाऊन सिंड्रोमच्या रूग्णांमध्ये दिसतात लक्षणे

- श्रवणशक्ती कमी होणे

- कानाचे संक्रमण

- दृष्टी कमी होणे

- डोळ्यातील मोतीबिंदू

- जन्मतःच हृदय दोष

- थायरॉईड

- आतड्यांसंबंधी संक्रमण

- अॅनिमिया

- लठ्ठपणा

अशा कपलच्या मुलांना असतो धोका

- उशीरा गर्भधारणा हे या आजाराचे सर्वात मोठे कारण मानले जाते.

- ३५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांमध्ये गर्भधारणेमुळे मुलामध्ये डाउन सिंड्रोमचा धोका वाढतो.

- कपलच्या पहिल्या अपत्याला डाऊन सिंड्रोम असेल तर दुसऱ्या अपत्यामध्ये देखील त्याचा धोका वाढतो.

- जर पालकांपैकी एकाला डाऊन सिंड्रोमचा त्रास असेल तर त्याच्या मुलाला डाऊन सिंड्रोम होण्याची शक्यता जास्त असते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel