मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Brain Exercise: बुद्धी तल्लख करण्यासाठी रोज करा हे ब्रेन एक्सरसाइज, स्मरणशक्तीही सुधारेल

Brain Exercise: बुद्धी तल्लख करण्यासाठी रोज करा हे ब्रेन एक्सरसाइज, स्मरणशक्तीही सुधारेल

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 16, 2023 10:57 PM IST

तुम्हाला माहित आहे का की घरी काही ब्रेन एक्सरसाइज करून तुम्ही फक्त तुमची बुद्ध तल्लख करु शकत नाही तर स्मरणशक्ती देखील सुधारू शकता. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.

ब्रेन एक्सरसाइज
ब्रेन एक्सरसाइज

Easy Brain Exercise to Improve Memory: दातांच्या आरोग्यासाठी दररोज ब्रश करणे, स्नायू मजबूत ठेवण्यासाठी व्यायाम आणि सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षणासाठी सनस्क्रीनचा वापर बहुतेक लोक न सांगता नियमित करतात. पण तुम्हाला हे माहित आहे का की घरीच मेंदूचे काही व्यायाम करून तुमची बुद्धी केवळ तीक्ष्ण होऊ शकत नाही तर तुमची स्मरणशक्ती देखील सुधारू शकता. चला जाणून घेऊया ब्रेन एक्सरसाइज म्हणजे काय आणि ते स्मरणशक्ती आणि मेंदूला तीक्ष्ण बनवण्यास कशी मदत करते.

ब्रेन एक्सरसाइज म्हणजे काय

जर सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ब्रेन एक्सरसाइज हा मेंदूशी संबंधित अशी कोणताही अॅक्टिव्हिटी असू शकते, ज्यामध्ये तुमचे मेंदू गुंतलेले असते. यामध्ये कॉम्प्युटर गेम्स खेळण्यापासून ते वाचन आणि लोकांशी बोलण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असू शकतो. तुमच्या मेंदूचा व्यायाम करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते करत असताना तुम्ही त्यात सक्रियपणे सहभागी होणे आवश्यक आहे.

मेंदू आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रोज करा हे ५ एक्सरसाइज

वर्कआउट

२०२२ मध्ये झालेल्या एका संशोधनात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की जे लोक नियमितपणे चालणे, धावणे, पोहणे, सायकलिंग, नृत्य, योग, खेळ आणि व्यायामात भाग घेतात त्यांना स्मृतिभ्रंश होण्याचा धोका त्या लोकांच्या तुलनेत १७ टक्क्यांनी कमी होता, ज्यांच्या दैनंदिन जीवनात या गोष्टींचा समावेश नव्हता. हे संशोधन सुचवते की जीवनात बरे वाटण्यासाठी तुम्ही करू शकता अशा सर्वोत्तम गोष्टींपैकी एक म्हणजे व्यायाम. डॉ. टॅन यांच्या मते, व्यायामामुळे मेंदूला रक्तपुरवठा वाढतो, ज्यामुळे स्ट्रोक, उच्च रक्तदाब, स्मृतिभ्रंश आणि मधुमेहाचा धोका कमी होतो.

आवडता खेळ

जर तुम्हाला तुमचा मेंदू शार्प बनवायचा असेल तर कोणताही आवडता खेळ खेळा ज्यासाठी तुम्हाला इतर लोकांची गरज आहे. डॉ. शार्रे यांच्या मते, तुमचे निर्णय घेण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता सुधारण्यासाठी इतर लोकांना मदत करणे आवश्यक असलेले गेम खेळले पाहिजे. उदाहरणार्थ खेळ खेळताना तुम्हाला अनेकदा स्वतःला विचारावे लागते की माझा जोडीदार कुठे आहे? ध्येय गाठण्यासाठी मी वेगाने धावले पाहिजे का? अशा खेळांमुळे तुम्हाला लोकांशी संवाद साधण्याची आणि तुमची निर्णय घेण्याची क्षमता सुधारण्याची संधी मिळते.

गणिताशी मैत्री करा

एका अभ्यासात असे आढळून आले आहे की ज्या ज्येष्ठ नागरिकांना सहा महिने दररोज गणिताच्या बेसिक समस्या दिल्या गेल्या तर त्यांची काम करण्याची आणि विचार करण्याची क्षमता सुधारली.

नवीन भाषा शिका

दोन भाषा जाणून घेतल्याने तुम्हाला अशा लोकांशी संपर्क साधता येतो ज्यांच्याशी तुम्ही यापूर्वी कधीही संवाद साधला नसेल. नवीन भाषा प्रवास करणे सोपे करते आणि तुमचा मेंदू निरोगी ठेवण्यास मदत करते. २०२० मध्ये केलेल्या एका संशोधनात असे आढळून आले की ज्या लोकांना एकापेक्षा जास्त भाषा बोलता येतात त्यांच्यात ज्या लोकांना फक्त एकच भाषा कळते त्यांच्या तुलनेत डिमेंशियाचा धोका दीर्घकाळात लक्षणीयरीत्या कमी असल्याचे दिसून आले.

कोडी सोडवा

वेगवेगळ्या प्रकारची कोडी सोडवण्याचा प्रयत्न करून तुमच्या मेंदूचे वेगवेगळे भाग सक्रिय राहतात. या कोडींमध्ये क्रॉसवर्ड पझल्स, जिगसॉ पझल्स विशेषतः उपयुक्त ठरू शकतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग