मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  बैसाखीला घ्या केशर भाताचा आस्वाद, करा सणाची मजा द्विगुणीत

बैसाखीला घ्या केशर भाताचा आस्वाद, करा सणाची मजा द्विगुणीत

Hiral Gawande HT Marathi
Apr 14, 2022 03:57 PM IST

सणासुदीत खाण्यापिण्याचा मनसोक्त आस्वाद घेतला जातो. तुम्हाला सुद्धा तुमचा बैसाखीचा सण खास बनवून सणाचा गोडवा वाढवायचा असेल तर ही खास रेसिपी तुमच्यासाठी. आज बैसाखीला हा केसर भात बनवून तुम्ही तुमच्या सणाचा आनंद द्विगुणीत करू शकता.

केशर भात
केशर भात

पंजाब मध्ये बैसाखीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशभरातील शीख धर्माचे लोक हा दिवस नवीन वर्ष म्हणून साजरा करतात. दरवर्षी वैशाख महिन्यात साजरा होणार हा सण यंदा १४ एप्रिल रोजी साजरा केला जात आहे. या महिन्यात रब्बी पीक काढले जात असल्याने बैसाखीचा दिवस शेतकऱ्यांसाठी खास असतो. हा हर्षोल्लासात साजरा करतानाच खाण्या पिण्याचा मनसोक्त आनंद घेतला जातो. तुम्हाला देखील हा सण खास बनवायचा असेल आणि तुम्ही काहीतरी गोड धोड करायचा विचार करत असाल तर तुम्ही ही खास केशरी भात नक्की ट्राय करा.

ट्रेंडिंग न्यूज

साहित्यः

- १ बाउल शिजलेला भात (बासमती तांदूळचा भात)

- १/२ वाटी साखर

- १० ते १२ केसरच्या काड्या

- ४ ते ५ विलायचीची पावडर

- ४ लवंग

- ६ ते ७ बदाम (कापलेले)

- ७ ते ८ पिस्ताचे तुकडे

- २ चमचे शुद्ध तूप

- २ चमचे गरम दूध

- खायचा पिवळा रंग

विधीः

केशरी भात बनवण्यासाठी सर्वप्रथम एका वाटीत दूध घेऊन त्यात केसरच्या १० ते १२ काड्या टाकून बाजूला ठेवून द्या. या नंतर साखरेचा पाक बनवण्यासाठी एका पॅनमध्ये साखर आणि अर्धी वाटी पाणी गरम करा. पाक उकळायला लागले की आच कमी करा आणि घट्ट होईपर्यंत शिजवा. हे करताना पाकमध्ये चमच्याने ढवळत त्यात केशर दूध घाला. पाक घट्ट होऊ लागले की बोटावर घेऊन पाकाचा तार चेक करा. तुमच्या पाकाची एक तार बनली पाहिजे, याची काळजी घ्या. पाकाची एक तार बनवल्यानंतर त्यात शिजलेला भात टाकून गॅस वाढवून द्या. भांड्याच्या तळाशी भात लागू नये म्हणून भात सतत ढवळत रहा. भात आणि साखरेचा पाक एकमेकांमध्ये नीट मिक्स होईपर्यंत शिजवा. यानंतर यात कापलेले ड्रायफ्रूट्स टाकून गॅस बंद करा.

भाताची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी त्याला दिल्या जाणाऱ्या तडक्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवा आणि त्यात दोन चमचे शुद्ध तूप टाकून गरम करा. गॅस मंद करून त्यात लवंग टाका. लवंग फुगल्यानंतर गॅस बंद करा. हा तडका भातावर टाकून नीट मिक्स करून घ्या. लवंगाचा सुगंध त्याची चव आणखी वाढवेल. तुमचा केशरी भात तयार आहे. सर्व्ह करण्यापूर्वी त्यावर ड्राय फ्रूट्सने गार्निश करा.

WhatsApp channel

विभाग