मराठी बातम्या / सोन्याचा भाव

भारतातील आजचा सोन्याचा दर

dateText 20 May, 2024
75071-293.00
२४ कॅरेट सोन्याचा दर (१० ग्रॅम)
68765-269.00
२२ कॅरेट सोन्याचा दर (१० ग्रॅम)

औद्योगिक वापराशिवाय चांदीचा वापर दागिने बनविण्यासाठी देखील केला जातो. भारतात सोन्याप्रमाणेच चांदीलाही मोठी मागणी असते. भारत हा चांदीचा सर्वात मोठा ग्राहक आणि आयातदार आहे. चांदीला असलेली ही मागणीच जगभरातील चांदीचे दर निश्चित करते. आयात कर व अन्य करांबरोबरच जागतिक बाजारातील दर देखील देशातील चांदीच्या दरावर परिणाम करत असतात. सोन्याप्रमाणे चांदीकडेही गुंतवणुकीचा एक आकर्षक पर्याय म्हणून पाहिले जाते. भारतातील प्रमुख शहरांतील चांदीचे दर (Silver Prices in India Today) खालीलप्रमाणे...

भारतातील सोन्याच्या भावाचा आलेख

महानगरातील सोन्याचा भाव20 May,2024

  • Bangalore

    Per 10 gram 74557 -514.00
  • Chennai

    Per 10 gram 74997 +146.00
  • Delhi

    Per 10 gram 75071 -293.00
  • Kolkata

    Per 10 gram 75511 +147.00
  • Mumbai

    Per 10 gram 75584 +366.00
  • Pune

    Per 10 gram 75805 +734.00

    पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा भाव

    सोन्याचा तुलनात्मक दर २२ कॅरेट विरुद्ध २४ कॅरेट

    भारताच्या विविध शहरातील सोन्याचा दर

    • City Name

    • 22 Carat Price

    • 24 Carat Price

    Show More

    मागील १५ दिवसांतील सोन्याचा दर

    • Dates

    • 22 Carat Price

    • 24 Carat Price

    • May 19, 2024
    • 69034 -336.00
    • 75364 -367.00
    • May 18, 2024
    • 69370 554.00
    • 75731 604.00
    • May 17, 2024
    • 68816 805.00
    • 75127 880.00
    • May 16, 2024
    • 68011 -302.00
    • 74247 -330.00
    • May 15, 2024
    • 68313 889.00
    • 74577 970.00
    • May 14, 2024
    • 67424 -454.00
    • 73607 -496.00
    • May 13, 2024
    • 67878 0.00
    • 74103 0.00
    • May 12, 2024
    • 67878 -201.00
    • 74103 -219.00
    • May 11, 2024
    • 68079 1011.00
    • 74322 1104.00
    • May 10, 2024
    • 67068 -68.00
    • 73218 -75.00
    • May 09, 2024
    • 67136 -481.00
    • 73293 -525.00
    • May 08, 2024
    • 67617 123.00
    • 73818 135.00
    • May 07, 2024
    • 67494 1044.00
    • 73683 1139.00
    • May 06, 2024
    • 66450 -587.00
    • 72544 -640.00

    सोन्याचे दर (Gold Price) हे दररोज (today gold rate) ठरवले जातात. लंडन बुलियन मार्केट असोसिएशनमध्ये सकाळी १०.३० वाजता आणि दुपारी ३ वाजता सोन्याची किंमत ठरवली जाते. त्यानंतर ती सर्वत्र जाहीर केली जाते. सोन्याचे दर ठरवणे हे इतर मालमत्तेच्या किंमती ठरविण्याइतके सरळसोपे नाही. उत्खनन, संशोधन व विकास, ग्राहक आणि पुनर्वापर या चार घटकांवर सोन्याचे दर अवलंबून असतात. उद्योग क्षेत्र, दागिने निर्मिती करणारे व्यावसायिक व गुंतवणूकदार हे प्रामुख्याने सोन्याचे ग्राहक असतात. भारतात सोने आणि चांदीला किती महत्त्व आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सण-वार आणि लग्न समारंभात सोन्याला मोठी मागणी असते. सोन्याचे भाव रोजच्या रोज बदलत असल्यामुळेच आजचा सोन्याचा भाव (Gold rate today) किती याविषयी लोकांना मोठी उत्सुकता असते.

    सोन्याच्या संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    प्रश्न: कोणते घटक सोन्याच्या भावावर परिणाम करतात?

    उत्तर: सोन्याचा भाव दररोज ठरवला जातो आणि त्यात सतत बदल होत असतो. या बदलासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात. महागाई, डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर, व्याजदरातील चढ-उतार, सणवार, लग्न समारंभ, पावसाची स्थिती, सरकारी गंगाजळी, अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता, आंतरराष्ट्रीय वातावरण या घटकांचा सोन्याच्या किंमतींवर परिणाम होतो.

    प्रश्न: २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्यामध्ये नेमका काय फरक असतो?

    उत्तर : कॅरेट हे सोन्याची शुद्धता मोजण्याचे एक परिमाण आहे. कॅरेटचे मूल्य जितके जास्त, तितकी सोन्याची शुद्धता अधिक असते. २४ कॅरेट सोने हे ९९.९० टक्के शुद्ध असते. त्यात इतर धातूंची भेसळ नसते. तर, २२ कॅरेट सोने ९१.६७ टक्के शुद्ध असते. त्यात तांबे आणि झिंक या धातूचे मिश्रण काही प्रमाणात असते. या मिश्रणामुळे २४ कॅरेट सोन्याच्या तुलनेत २२ कॅरेटचे सोने टणक असते. शुद्धतेतील फरकामुळं साहजिकच २४ कॅरेट सोने हे महाग असते. मात्र, २४ कॅरेट सोने हे फारच नाजूक असल्याने दैनंदिन वापरापेक्षा गुंतवणुकीसाठी ते उपयुक्त असते.

    प्रश्न: सोन्याचे हॉलमार्किंग करणे म्हणजे काय?

    उत्तर : हॉलमार्क हे एक चिन्ह असते. सोने खरेदी करणाऱ्यांना त्याच्या शुद्धतेची खात्री व्हावी म्हणून भारतीय मानक ब्यूरो (Bureau of Indian Standards) ची मान्यता असलेल्या संस्थेकडून दागिन्यांवर हे चिन्ह लावले जाते. सोने खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी हे चिन्ह महत्त्वाचे ठरते. हॉलमार्कचे चिन्ह असल्यास सोने शुद्ध आहे असे मानले जाते.