मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Yashoda : बयोचा 'श्यामची आई' होण्याचा प्रवास सुरु

Yashoda : बयोचा 'श्यामची आई' होण्याचा प्रवास सुरु

Aarti Vilas Borade HT Marathi
May 13, 2023 09:02 AM IST

Yashoda : बयोचा 'श्यामची आई' होण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. या दिवशी पार पडणार विवाहसोहळा

Yashoda
Yashoda

झी मराठीवर सुरु झालेली एक प्रबोधन आणि संस्कार पर मालिका म्हणजे “यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची.” या मालिकेने लहान मुलं आणि पालकांच्या मनात घर देखील केले. आता ही मालिका रंजक वळणावर पोहोचली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

“यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची” मालिकेतील अवखळ अल्लड तसेच अतिशय धीट असलेल्या बयोच्या आयुष्यात नवीन घटना घडणार आहे ती म्हणजे बयोचा लवकरच सदाशिवरावांबरोबर विवाह होणार आहे. प्रेक्षकांची लाडकी बयो आता यशोदा सदाशिवराव साने होणार व तिचा नवीन जन्म होणार आहे.
वाचा: अश्विनी-श्रेयस अखेर घराबाहेर पडले; नवा ठावठिकाणा शोधताना होणार कुटुंबाचे हाल!

सदाशिवराव साने यांच्या बरोबर सहचारिणी म्हणून यशोदेचा नवीन प्रवास सुरु होणार आहे. बयोचा वैशाख कृष्ण द्वितीयेला विवाह सोहळा सम्पन्न होणार आहे. मालिकेतील हा भाग १६ मे रोजी संध्याकाळी प्रदर्शित होणार आहे.

“यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची” ही कथा आहे यशोदाची म्हणजेच एका अश्या आईची आहे जिने साने गुरुजींना घडवलं, ही मालिका आपल्या मुलांवर संस्कार व्हावेत आणि आपली संस्कृती कळावी यासाठी सुरु केली होती. आता मालिकेतील बयोचा श्यामची आई होण्याचा प्रवास सुरु झाला आहे.

IPL_Entry_Point

विभाग