मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: ब्रश करता-करता गाणं गायला लागला पठ्ठ्या; आवाज ऐकून चकीत व्हाल!

Viral Video: ब्रश करता-करता गाणं गायला लागला पठ्ठ्या; आवाज ऐकून चकीत व्हाल!

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 24, 2023 10:01 AM IST

सध्या सोशल मीडियावर एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील मुलाच्या आवाजाने अनेकांची मने जिंकली आहेत.

व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ (HT)

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. अनेकांचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे रातोरात आयुष्य बदलले आहे. आता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओवरुन असेच काहीसे म्हटले जात आहे. या व्हिडीओमधील मुलाचा सुमधूर आवाज ऐकून भविष्यात तो गायक म्हणून लोकप्रिय होईल असे म्हटले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगा ब्रश करताना दिसत आहे. ब्रश करता करता त्याने 'दिल दे दिया है' हे गाणे गायिले आहे. त्याच्या या गाण्याची सगळीकडे वाहवाह केली जात आहे. अनेकांनी कमेंट करत या मुलाचे कौतुक केले आहे. अभिनेता सोनू सूदने देखील या मुलाचे कौतुक केले आहे.
वाचा: ‘बाहुबली २’ला ‘पठाण’ने दिली मात; शाहरुखच्या चित्रपटाने रचला नवा विक्रम!

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ बिहारमधील असल्याचे म्हटले जात आहे. समस्तीपुर जिल्ह्यातील पटोरी गावात राहणारा मुलगा आहे. या मुलाचे नाव अमरजीत जयकर असे आहे.

यापूर्वी सोशल मीडियावर पश्चिम घाटातील एका रेल्वेस्टेशनवर गाणे गाताना रानू मंडल यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच रानू मंडलचे संपूर्ण आयुष्य बदलले. ती रातोरात स्टार झाली. तिला हिमेश रेशमीयाच्या चित्रपटात गाण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर आता ती बांग्लादेशी सुपरस्टारसोबत गाणे गाताना दिसत आहे. आता या मुलाचा व्हिडीओपाहून त्याला देखील बॉलिवूड गाणी गाण्याची संधी देण्याची मागणी करण्यात येत आहे.

IPL_Entry_Point

विभाग