मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ustad Rashid Khan: असे लोक कधीच मरत नाहीत! पाकिस्तानी गझल गायक गुलाम अलींकडून राशिद खान यांना श्रद्धांजली

Ustad Rashid Khan: असे लोक कधीच मरत नाहीत! पाकिस्तानी गझल गायक गुलाम अलींकडून राशिद खान यांना श्रद्धांजली

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 11, 2024 11:36 AM IST

Ustad Ghulam Ali shares his heartfelt condolences: राशिद खान यांच्या निधनामुळे गुलाम अली देखील शोकमग्न झाले आहेत. त्यांनी आपल्या या जवळच्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

Ustad Ghulam Ali shares his heartfelt condolences
Ustad Ghulam Ali shares his heartfelt condolences

Ustad Ghulam Ali shares his heartfelt condolences: भारतीय मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचं निधन झालं. प्रोटेस्ट कर्करोगाशी लढा देण्यात उस्ताद राशिद खान अपयशी ठरले. वयाच्या अवघ्या ५५व्या वर्षी त्यांचे उपचारांदरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगीत विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. पाकिस्तानचे प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांनी देखील उस्ताद राशिद खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आपला एक व्हिडीओ शेअर करत अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.

पाकिस्तानातील प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांनी आपल्या गझलांनी जगभरात वाहवा मिळवली आहे. गुलाम अली यांचे उस्ताद राशिद खान यांच्याशी फार जवळचे संबंध होते. गुलाम अली अनेकदा कामानिमित्ताने कोलकात्यात यायचे, तेव्हा दोघांच्या भेटीगाठी व्हायच्या. राशिद खान यांच्या निधनामुळे गुलाम अली देखील शोकमग्न झाले आहेत. त्यांनी आपल्या या जवळच्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. एका व्हिडीओद्वारे राशिद खान यांना श्रद्धांजली वाहताना उस्ताद गुलाम अली म्हणाले की, ‘आजचा दिवस खूपच दु:खद आहे. भारतीयच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध असलेले शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचे निधन झाले आहे.’

Zeenat Aman: ‘सत्यम शिवम..’मध्ये दीपिका चालेल पण बायोपिकसाठी....; झीनत अमान यांनी घेतलं ‘या’ अभिनेत्रीचं नाव!

या व्हिडीओ मेसेजमध्ये ते पुढे म्हणाले की, ‘असे लोक कधीच मरत नाहीत. आपल्या कलेच्या माध्यमातून ते नेहमीच प्रेक्षकांच्या मनात अजरामर राहतात. त्यांचं काम नेहमीच जिवंत राहतं. माझे आणि त्यांचे खूप जवळचे संबंध होते. जेव्हाही मी कोलकात्यात जायचो, तेव्हा आम्ही दोघे रात्रभर गप्पा मारत बसायचो. ते मला नेहमी म्हणचे की, गुलाम साहब काही गझला ऐकावा. ते स्वतः इतके मोठे गायक असताना देखील मला आग्रह करायचे. असं खूप प्रेमाने कौतुक करणारे ते एकमेव व्यक्तिमत्त्व होते. त्यांचं जाणं चटका लावणारं आहे. जन्माला आलेल्या सगळ्यांनाच एक दिवस देवाकडे जायचं आहे. पण, देवाकडे एक प्रार्थना आहे की, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.’

प्रसिद्ध शास्त्रीय गायक राशिद खान हे गेल्या काही काळापासून प्रोस्टेट कर्करोगाशी झुंज देत होते. कॅन्सरच्या उपचारांदरम्यान राशिद खान यांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. या दरम्यानच त्यांना सेरेब्रल अटॅक देखील आला होता. यानंतर त्यांचीही प्रकृती खालावली होती. राशिद खान हे रामपूर-सहस्वान घराण्यातील खान हे घराण्याचे संस्थापक इनायत हुसेन खान यांचे पणतू होते. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

WhatsApp channel

विभाग