
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपटू ऋषभ पंत आणि उर्वशी यांच्यामधील वाद जगजाहीर आहे. अशातच उर्वशीने दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता नागार्जुनच्या मुलाविरोधात तक्रार केल्याचे म्हटले जात आहे. एका चित्रपट समीक्षकाने याबाबत माहिती दिली आहे. मात्र आता सत्य समोर आले आहे.
नागार्जुन यांचा मुलगा अभिनेता अखिल अक्किनेनीसोबत उर्वशी 'एजंट' या चित्रपटाचे परदेशात शुटिंग करत आहे. शुटिंगदरम्यान अखिलने उर्वशीसोबत गैरवर्तन केल्याची माहिती युएईस्थित स्वयंघोषित चित्रपट समीक्षक उमैर संधू यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. हे खोटे असल्याचे उर्वशीने म्हटले आहे. आता या वृत्ताविरोधात उर्वशीने कायदेशीर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिने माहिती दिली आहे.
वाचा: ड्रीम गर्ल २’मध्ये सलमान सांगणार अविवाहित असण्यामागचे कारण? मजेशीर टीझर चर्चेत
यूरोपमध्ये सुरु असलेल्या एजंट या चित्रपटातील आयमसॉंगच्या चित्रीकरणादरम्यान अखिल अक्कीनेनीने उर्वशीला त्रास दिला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अखिल हा मॅच्युअर नसून त्याच्यासोबत शुटिंग करताना उर्वशीला ठिक वाटत नव्हते या आशयाचे ट्वीट उमैर संधू यांनी केले.
उमैरच्या या पोस्टनंतर उर्वशी चांगलीच संतापली आहे. ‘माझ्या लीगल टीमकडून त्यांना मानहानीची नोटीस बजावण्यात आली आहे. अशा खोट्या ट्विट्समुळे तुमच्यासारख्या पत्रकारांवर मी नाराज आहे. तुम्ही माझे अधिकृत प्रवक्ते नाहीत. पण तुम्ही नक्कीच बालिश पत्रकार आहेत ज्याने मला आणि माझ्या कुटुंबीयांना त्रास दिला आहे’ या आशयाची पोस्ट उर्वशीने केली आहे.
संबंधित बातम्या
