मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urfi Javed Video: लाल बिकिनीमध्ये उर्फीने वाढवला इंटरनेटचा पारा; व्हॅलेंटाईन स्पेशल लूक व्हायरल!

Urfi Javed Video: लाल बिकिनीमध्ये उर्फीने वाढवला इंटरनेटचा पारा; व्हॅलेंटाईन स्पेशल लूक व्हायरल!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 14, 2023 05:16 PM IST

Urfi Javed Valentines special look Video: आता ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी उर्फीने तिचा खास हॉट लूक दाखवला आहे. या नव्या व्हिडीओमध्ये उर्फीने लाल रंगाची बिकिनी परिधान केली आहे.

Urfi Javed
Urfi Javed

Urfi Javed Valentines special look Video: हटके स्टाईलच्या बाबतीत उर्फी जावेदच्या चर्चा आता बॉलिवूडपासून थेट हॉलिवूडपर्यंत रंगू लागल्या आहेत. उर्फी केवळ तिच्या कपड्यांमुळे आणि हटके स्टाईलमुळेच चर्चेत असते. उर्फीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. आता ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी उर्फीने तिचा खास रेड हॉट लूक दाखवला आहे. या नव्या व्हिडीओमध्ये उर्फीने लाल रंगाची बिकिनी परिधान केली असून, त्यावर लाल रंगाचा श्रग परिधान केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उर्फीचा हा लूक एकदम वेगळा आहे. उर्फीचा रेड बिकिनी लूक आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी अतिशय मादक दिसत असल्याचे तिचे चाहते म्हणत आहेत. उर्फीचा हा लूक आतापर्यंतचा सगळ्यात हॉट लूक असल्याचे म्हटले जात आहे. लाल बिकिनी, मोकळे केस, हाय हिल्स परिधान केलेली उर्फी चाहत्यांच्या मनाला घायाळ करत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फीचा टॅटूही स्पष्टपणे दिसत आहे.

उर्फी जावेद सोशल मीडियावर आपल्या बोल्ड लूकने सर्वांनाच घायाळ करत असते. सोशल मीडियावर नेहमीच अंगप्रदर्शन करणाऱ्या उर्फीने या व्हिडीओमध्ये बिकिनी परिधान केली आहे. मात्र, या हॉट आऊटफिटने उर्फी जावेदच्या सिझलिंग लूकमध्ये आणखी भर घातली आहे. उर्फी मॉडेल असण्याव्यतिरिक्त अभिनेत्री देखील आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

उर्फी जावेदचा हा बोल्ड व्हिडीओ पाहून नेटकरी देखील हैराण झाले आहेत. अनेकांनी तिच्या या व्हिडीओ कमेंट्स करत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, उर्फीने नेहमीप्रमाणेच तिचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज दाखवला आहे. कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना उर्फी नेहमीच सडेतोड उत्तर देत असते. उर्फी जावेद बर्‍याचदा असे आऊटफिट परिधान करते की, ज्यामुळे ती चर्चेत येते. मात्र, यावेळी उर्फीच्या फॅशन सेन्सचे अनेकांनी कौतुक केले आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी देखील असे कपडे परिधान केल्यामुळे काही लोकांनी तिला ट्रोल देखील केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग