मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tunisha Sharma: तुनिषाचा फोन अनलॉक करण्यात पोलिसांना यश; शिजानच्या कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ!

Tunisha Sharma: तुनिषाचा फोन अनलॉक करण्यात पोलिसांना यश; शिजानच्या कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 30, 2022 08:02 AM IST

Tunisha Sharma Death Case: तुनिषा प्रकरणात पोलिसांचे तपासचक्र अतिशय वेगाने फिरत आहे. शिजान खान याला अटक केल्यानंतर पोलीस कसून चौकशी करत आहेत.

Tunisha Sharma
Tunisha Sharma

Tunisha Sharma Death Case: अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्येमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी टोकाचं पाऊल उचलत आणि आयुष्य संपवणाऱ्या तुनिषाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. या दरम्यान अनेक आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू आहे. तुनिषाच्या निधनानंतर तिच्या आईने अभिनेता शिजान खान याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर त्याला अटकही करण्यात आली. तर, आता तुनिषाचा फोन अनलॉक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या फोनमध्ये शिजानच्या कुटुंबीयांचे मेसेज देखील आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

तुनिषा प्रकरणात पोलिसांचे तपासचक्र अतिशय वेगाने फिरत आहे. शिजान खान याला अटक केल्यानंतर पोलीस कसून चौकशी करत आहेत. यातच आत तुनिषा फोन अनलॉक झाल्याने त्यातूनही काही नवे दुवे आणि पुअरावे सापडण्याची शक्यता आहे. तुनिषाचा प्रकरणात तिचा मोबाईल महत्त्वाचा दुवा मानला जात आहे. यामुळेच वालीव पोलिसांनी अॅपलच्या अधिकाऱ्यांना फोन अनलॉक करण्यासाठी पाचारण केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फोन अनलॉक झाल्यानंतर तुनिषाच्या फोनमध्ये शिजानच्या आईचे आणि त्याच्या बहिणींचे मेसेज देखील सापडले आहेत.

या प्रकरणी पोलीस लवकरच शिजानच्या कुटुंबीयांची चौकशी करू शकतात, असे म्हटले जात आहे. यापूर्वी पोलिसांनी शिजान खानचा फोनही तपासला होता. या तपासात पोलिसांना दोघांमधील रोजच्या संभाषणाचे मेसेज मिळाले. मात्र, पोलिसांनी या दरम्यान शिजानच्या फोनमधून त्याच्या सिक्रेट गर्लफ्रेंडची माहिती मिळाली आहे. दरम्यान पोलिसांना तुनिषाने लिहिलेली एक नोट देखील सेटवर सापडल्याने आता या प्रकरणात शिजान खान आणि त्याच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरूनच मुंबई पोलिसांनी शीजान मोहम्मद खानला अटक केली आहे. या तक्रारीत तुनिषाच्या आईने म्हटले की, दोघे जूनपासून अलिबाबा दास्तान-ए-कुबूल या टीव्ही मालिकेचे शूटिंग करत होते, ज्यामध्ये शिजान मुख्य भूमिकेत होता. तुनिषाने तिच्या आईला सांगितले होते की, ती आणि शिजान रिलेशनशिपमध्ये आहेत. पण, काही दिवसांपूर्वी तिने रडत रडत तिच्या आईला सांगितले की, शिजानने तिच्याशी ब्रेकअप केला होता. यानंतर नैराश्यातून तुनिषाने आत्महत्या केली.

IPL_Entry_Point

विभाग