मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी ४’च्या घरात मोठा ट्वीस्ट येणार; ‘या’ स्पर्धकाची पुन्हा एन्ट्री होणार!

Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी ४’च्या घरात मोठा ट्वीस्ट येणार; ‘या’ स्पर्धकाची पुन्हा एन्ट्री होणार!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 30, 2022 07:45 AM IST

Bigg Boss Marathi 4 Update: महाअंतिम सोहळ्याला अवघे काही दिवस उरले असताना, आता घरात एका एलिमिनेट झालेल्या सदस्याची पुन्हा एन्ट्री होणार आहे.

Bigg Boss Marathi 4
Bigg Boss Marathi 4

Bigg Boss Marathi 4 Update: ‘बिग बॉस मराठी ४’च्या खेळ आता ८८व्या दिवसांत पोहोचला आहे. या खेळाच्या शेवटच्या टप्प्यात ‘बिग बॉस’च्या घराला पहिला फायनलिस्ट मिळणार आहे. मात्र. या दरम्यान एक मोठा ट्वीस्ट देखील येणार आहे. गेल्या ८८ दिवसांत या घरात अनेक राडे, वाद आणि धमाल मस्ती पाहायला मिळाली. मात्र, आता शेवटच्या टप्प्यात आपलं स्तःन निश्चित करण्यासाठी उरलेल्या स्पर्धकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. महाअंतिम सोहळ्याला अवघे काही दिवस उरले असताना, आता घरात तेजस्विनी लोणारी हिची पुन्हा एन्ट्री होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नुकताच बिग बॉस मराठी ४चा एक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घराचा दरवाजा उघडून तेजस्विनी लोणारी आत येताना दिसली आहे. तिला पाहून सगळ्यांनाच प्रचंड आनंद झाला आहे. ‘बिग बॉस मराठी ४’ची स्पर्धक आणि आभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने आपल्या खेळाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. मात्र, एका टास्क दरम्यान हाताला झालेल्या दुखापतीमुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तेजस्विनीला घराबाहेर जावे लागले. यानंतर चाहतेच नव्हे, तर घरातील स्पर्धक देखील हळहळले.

मात्र. आता अशा अचानक झालेल्या एन्ट्रीमुळे इतर स्पर्धकांना मोठा धक्का देखील बसला आहे. तेजस्विनी केवळ घरात आलीये की, खेळात देखील परतली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, खेळाच्या शेवटच्या टप्प्यात जर आता तेजस्विनीला पुन्हा एक संधी मिळाली असेल, तर इतर स्पर्धकांना आपली जागा टिकवून ठेवण्यासाठी आणखी धडपड करावी लागणार आहे. तेजस्विनी लोणारी आता घरात नक्की का आलीये, हे येत्या भागांत कळणार आहे.

एका टास्क दरम्यान तेजस्विनीच्या हाताला मार लागला होता. त्यानंतरही काही दिवस ती बिग बॉसच्या घरात होती. मात्र, हाताची दुखापत वाढल्याने तिला डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी घराबाहेर येण्यास सांगितले होते. तेजस्विनीच्या अशा अचानक घरातून एक्झिटमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. मात्र, आता पुन्हा एकदा तेजस्विनी लोणारीला घरात बघून सगळ्यांना आनंद झाला आहे.

IPL_Entry_Point

विभाग