मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  The Kerala Story OTT: ‘द केरळ स्टोरी’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार; कधी आणि कुठे?

The Kerala Story OTT: ‘द केरळ स्टोरी’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार; कधी आणि कुठे?

Aarti Vilas Borade HT Marathi
May 31, 2023 01:34 PM IST

The Kerala Story: गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

The Kerala Story
The Kerala Story

द केरळ स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटावर काही ठिकाणी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे तर काही ठिकाणी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. राजकीय वर्तुळातील अनेकांनी या चित्रपटावर टीका केली. मात्र, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. जाणून घ्या हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट झी५ या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. अद्याप या चित्रपटाची ओटीटीवर प्रदर्शित होण्याची तारीख समोर आलेली नाही. मात्र, लवकरच याबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाचा: कांचन आणि अप्पांनी मानले आशुतोषचे आभार, काय आहे प्रकरण?

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, केरळमधील ३२००० हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे ब्रेनवॉश करण्यात आले. यानंतर त्यांना लव्ह जिहादमध्ये अडकवून त्यांना सीरियाला पाठवण्यात आले, जिथे त्यांच्यासोबत धक्कादायक घटना घडल्या.

‘द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. यात अभिनेत्री अदा शर्मा हिच्यासोबत योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाने जवळपास २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग