मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ लवकरच गाठणार १०० कोटींचा टप्पा! पाहा सहाव्या दिवसाचे कलेक्शन

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ लवकरच गाठणार १०० कोटींचा टप्पा! पाहा सहाव्या दिवसाचे कलेक्शन

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 11, 2023 11:03 AM IST

The Kerala Story Box Office Collection: अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेला ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट आता १०० कोटींचा गल्ला जमावण्यापासून काहीच पावलं दूर आहे.

The Kerala Story
The Kerala Story

The Kerala Story Box Office Collection: द केरळ स्टोरी’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. काही राज्यांमध्ये तर या चित्रपटावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तर, काही राज्यांमध्ये मात्र हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. बंदी आणि बहिष्काराच्या दरम्यान ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट आता १०० कोटींचा गल्ला जमावण्यापासून आता काहीच पावलं दूर आहे. ‘द केरळ स्टोरी’ने रिलीजच्या सहाव्या दिवसापर्यंत धमाकेदार कमाई केली आहे.

‘द केरळ स्टोरी’च्या कलेक्शनचे आकडे आता समोर आले आहेत. या आकडेवारीनुसार, ‘द केरळ स्टोरी’ने सहाव्या दिवशी म्हणजेच मिड वीकमध्ये १२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सहाव्या दिवसाच्या कमाईसह चित्रपटाची एकूण कमाई आता ६८.८६ कोटींवर पोहोचली आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ज्याप्रकारे कमाई करत आहे, त्यावरून हा चित्रपट वीकेंडपर्यंत १०० कोटींचा टप्पा ओलांडणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

Bigg Boss OTT 2: ‘बिग बॉस ओटीटी’मधून करण जोहरचा पत्ता कट? पुन्हा सलमान खानच्या हाती येणार धुरा!

अदा शर्माचा चित्रपट 'द केरळ स्टोरी'ने पहिल्याच दिवशी ८.०३ कोटींचा आकडा पार केला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ११.२२ कोटींचा व्यवसाय केला. तर, तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने १६.४ कोटी, चौथ्या दिवशी १०.०७ कोटी आणि पाचव्या दिवशी ११.१४ कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले असून, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला आहे. काही ठिकाणी तो करमुक्त करण्यात आला आहे, तर काही ठिकाणी या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.

‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला होता. आता चित्रपटाच्या नजरा १०० कोटींच्या क्लबकडे लागल्या आहेत. या वीकेंडपर्यंत हा चित्रपट १०० कोटींहून अधिक कमाई करू शकेल, असे म्हटले जात आहे. याचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून, विपुल अमृतलाल शाह यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात अदा शर्मा मुख्य भूमिकेत झळकली आहे.

IPL_Entry_Point

विभाग