Bigg Boss OTT Season 2: छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस ओटीटी’चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस ओटीटीचा पहिला सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला. या सीझनला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले होते. ‘बिग बॉस ओटीटी’ सीझन १चे यश पाहून आता निर्मात्यांनी सीझन २ आणण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु, आता या शोच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसणार आहे. कारण, ‘बिग बॉस ओटीटी २’मधून करण जोहरला हटवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस ओटीटी सीझन २’चा होस्ट आता बदलणार आहे. मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, करण जोहरच्या ऐवजी आता सलमान खान हा शो होस्ट करणार आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, बिग बॉस ओटीटीचा प्रीमियर भव्य पद्धतीने होईल आणि वादग्रस्त शो पुढचे ३ महिने चालेल. त्यानंतर बिग बॉस सीझन १७चे टेलिकास्ट सुरू होणार आहे. मात्र, बिग बॉस ओटीटी बाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
रिपोर्टनुसार, बिग बॉस ओटीटी २ मेच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला प्रसारित होऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार, हा शो जवळपास ३ महिन्यांसाठी प्रसारित करण्याची योजना आखण्यात आली आहे. तर, सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान ‘बिग बॉस सीझन १७’ प्रसारित करण्याची योजना बनवण्यात आली आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ कोणत्या चॅनल किंवा प्लॅटफॉर्मवर प्रसारित होईल, याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
बिग बॉस ओटीटी वूटवर स्ट्रीम केला जाईल, असा अंदाज आहे. या शोचे प्री-प्रॉडक्शनही सुरू झाले आहे. या शोचा पहिला सीझन अभिनेत्री दिव्या अग्रवालने जिंकला होता. पहिल्या सीझनमध्ये शमिता शेट्टी, राकेश बापट, उर्फी जावेद जीशान खान, निशांत भट, प्रतीक सहजपाल आणि नेहा भसीन यांनी सहभाग घेतला होता. बिग बॉस ओटीटी फिनालेनंतर प्रतीक, शमिता आणि निशांत यांनीही बिग बॉस १५मध्ये देखील भाग घेतला होता. ‘बिग बॉस ओटीटी’चा पहिला सीझन दिव्या अग्रवाल जिंकली होती.