मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raavrambha: ‘रावरंभा’साठी प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार? पाहा नेमकं काय घडलं...
Raavrambha
Raavrambha

Raavrambha: ‘रावरंभा’साठी प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार? पाहा नेमकं काय घडलं...

11 May 2023, 8:48 ISTHarshada Bhirvandekar

Raavrambha Film Postponed: नुकतीच ‘रावरंभा’च्या टीमने या चित्रपटाचे रिलीज लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती दिली आहे.

Raavrambha Film Postponed: मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये सध्या ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली आहे. महाराष्ट्राबरोबरच अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहासावर अनेक चित्रपट येत आहेत. अशातच आता ‘रावरंभा’ हा प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत असणारा बहुचर्चित, भव्यदिव्य चित्रपट १२ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, आता प्रेक्षकांना या चित्रपटासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. आता या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नुकतीच ‘रावरंभा’च्या टीमने या चित्रपटाचे रिलीज लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती दिली आहे. ‘काही तांत्रिक कारणांमुळे ऐतिहासिक रावरंभा हा चित्रपट येत्या शुक्रवारी १२ मे रोजी प्रदर्शित होण्याऐवजी काही तांत्रिक कारणांमुळे रसिकांची दिलगिरी व्यक्त करून २६ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या दिमाखात प्रदर्शित करत आहोत’, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Adah Sharma Birthday: चित्रपटांसाठी ‘द केरळ स्टोरी’च्या अभिनेत्रीने सोडलं शिक्षण! वाचा अदा शर्माबद्दल..

‘युगप्रवर्तक शिवछत्रपतींच्या भारलेल्या काळाची पार्श्वभूमी असलेल्या आणि शौर्य, पराक्रमात भिजलेल्या एका झुंजार मावळ्याची अनोखी प्रेमकहाणी 'रावरंभा' आता येत आहे दि. २६ मे २०२३ रोजी..आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहू द्या’, असं म्हणत त्यांनी प्रेक्षकांना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. स्वराज्याच्या चौथ्या राजधानीतील म्हणजे शाहूनगरी सातारमधील हा पहिला ऐतिहासिक चित्रपट असून शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुप जगदाळे यांनी सांभाळली आहे.

नुकताच ‘रावरंभा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. 'रावरंभा' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये राव आणि रंभा यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. इतिहासाच्या पानांमध्ये ‘रावरंभा’ ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक दुर्लक्षित पण अनोखी प्रेमकहाणी दडली आहे. ही प्रेमकथा नुसतीच प्रेमकथा नाही, तर तिला वास्तवाचे भरजरी कोंदण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याप्रती आणि स्वराज्याच्या प्रती असलेली निष्ठा, शौर्याची, त्यागाची आणि समर्पणाची किनार या कथेला असल्याचे दिग्दर्शक अनुप जगदाळे सांगतात.

विभाग