मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Adah Sharma Birthday: चित्रपटांसाठी ‘द केरळ स्टोरी’च्या अभिनेत्रीने सोडलं शिक्षण! वाचा अदा शर्माबद्दल..

Adah Sharma Birthday: चित्रपटांसाठी ‘द केरळ स्टोरी’च्या अभिनेत्रीने सोडलं शिक्षण! वाचा अदा शर्माबद्दल..

May 11, 2023 08:16 AM IST

Adah Sharma Birthday: ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटामुळे अभिनेत्री अदा शर्मा सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. आज अदा आपला वाढदिवस साजरा करत आहे.

Adah Sharma
Adah Sharma

Adah Sharma Birthday: ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटामुळे अभिनेत्री अदा शर्मा सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. आज (११ मे) अदा आपला वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री अदा शर्मा तिच्या ग्लॅमरस फोटो आणि फिटनेस व्हिडीओंमुळे खूप प्रसिद्ध आहे. ११ मे १९९२ रोजी मुंबईत जन्मलेल्या अदाहने २००८मध्ये विक्रम भट्टच्या '१९२०' या हॉरर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील तिची लिसाची व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती. २०१४मध्ये ‘हँसी तो फँसी’ हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, तिने साऊथ चित्रपटांमध्ये एन्ट्री घेतली. तिने अनेक तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अदा इंडस्ट्रीतील अतिशय फिट अभिनेत्रींमध्ये गणली जाते. ती दररोज तिच्या वर्कआउट आणि डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अदाला लहानपणापासूनचा अभिनयाची आवड होती. अदाचे वडील एस.एल. शर्मा मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होते आणि त्यांची आई शास्त्रीय नृत्यांगना आहे. अदा दहावीत असतानाच तिने ठरवलं होतं की, तिला अभिनेत्री व्हायचं आहे. अभिनयासाठी तिला शाळा सोडायची होती. पण, तिच्या पालकांनी तिला शालेय शिक्षण पूर्ण करण्यास सांगितले.

Sadashiv Amrapurkar Birthday: मनोरंजन विश्वातील असा खलनायक, ज्यांना धर्मेंद्र मानायचे लकी चार्म!

त्यानंतर बारावी पूर्ण होताच अदाने शिक्षण सोडले आणि चित्रपटात पाऊल ठेवले. आता अदा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे व्हिडिओ शेअर करते. अदा शर्मा एक जिम्नॅस्ट आहे आणि तिला जिम्नॅस्टिकसोबत डान्स करण्याचीही आवड आहे. ती वयाच्या तीन वर्षापासून नृत्य करत आहे आणि तिने मुंबईतील नटराज गोपी कृष्ण कथ्थक डान्स अकादमीमधून कथ्थकमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. यासोबत ती जॅझ, बेली आणि बॅले देखील करते. एवढेच नाही तर, अदा अमेरिकेत चार महिने साल्साही शिकली आहे. अदाच्या डान्सचे व्हिडिडीओ पाहून चाहते तिच्या स्टाइलकडे आकर्षित होतात.

सध्या अदा शर्मा सध्या तिच्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली आहे. ‘द केरळ स्टोरी’मध्ये अभिनेत्री अदा शर्माच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात केरळमधील ४ मुलींची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांना प्रथम इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी ब्रेनवॉश केले जाते, नंतर त्यांना ब्लॅकमेल करून बळजबरीने ISIS मध्ये सामील केले जाते. केरळसह अनेक राज्यांमध्ये या चित्रपटाच्या कथेला तीव्र विरोध होत आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग