मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sridevi Biography: श्रीदेवीचं आयुष्य पुस्तकरूपात उलगडणार; बोनी कपूर यांची मोठी घोषणा!

Sridevi Biography: श्रीदेवीचं आयुष्य पुस्तकरूपात उलगडणार; बोनी कपूर यांची मोठी घोषणा!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 09, 2023 04:29 PM IST

Sridevi Biography : पुस्तक रूपातून श्रीदेवी यांचा जीवन प्रवास उलगडला जाणार आहे. खुद्द बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या आयुष्यावरील या पुस्तकाची घोषणा केली आहे.

Sridevi
Sridevi

Sridevi Biography : मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जीवनावर एक पुस्तक लिहिले जात आहे. हे पुस्तक याच वर्षी म्हणजेच २०२३मध्ये प्रकाशित केले जाणार आहे. श्रीदेवी यांनी अनेक आयकॉनिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता पुस्तक रूपातून श्रीदेवी यांचा जीवन प्रवास उलगडला जाणार आहे. खुद्द बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या आयुष्यावरील या पुस्तकाची घोषणा केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, संशोधक-लेखक धीरज कुमार हे सुपरस्टार श्रीदेवीच्या जीवनावर पुस्तक लिहित आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

बोनी कपूर यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, श्रीदेवीला दमदार अभिनयाची देणगी होती. तिने तिच्या कलेने सगळ्यांचेच मनोरंजन केले. बॉलिवूडची ‘ हवाहवाई’ असणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले होते.

मात्र, आपल्या अप्रतिम कारकिर्दीने आणि सौंदर्याने लोकांच्या हृदयात अमिट छाप सोडणाऱ्या श्रीदेवीचे दुर्दैवाने २०१८मध्ये निधन झाले. श्रीदेवीच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. आता श्रीदेवीच्या आठवणी 'श्रीदेवी- द लाईफ ऑफ ए लेजेंड' नावाच्या या पुस्तकातून जपल्या जाणार आहेत.

येत्या २४ फेब्रुवारी रोजी, श्रीदेवीच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्ताने अभिनेत्रीचा 'इंग्लिश विंग्लिश' हा चित्रपट चीनमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात येणार आहे. अभिनेत्री श्रीदेवीच्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. गौरी शिंदे दिग्दर्शित ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर २०१२ मध्ये टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला होता. थिएटरमध्ये देखील या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला. आता पुन्हा एकदा ‘इंग्लिश-विंग्लिश’ हा चित्रपट चीनी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग