मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Janhvi Kapoor: नेपोकिड म्हणून ट्रोल होण्यावर जान्हवी कपूर पहिल्यांदाच बोलली; म्हणाली...

Janhvi Kapoor: नेपोकिड म्हणून ट्रोल होण्यावर जान्हवी कपूर पहिल्यांदाच बोलली; म्हणाली...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 09, 2023 03:41 PM IST

Janhvi Kapoor : जान्हवी कपूरने अल्पावधीतच इंडस्ट्रीत आपले खास स्थान निर्माण केले आहे. स्टार किड असूनही जान्हवीने आपले स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.

Janhvi Kapoor
Janhvi Kapoor

Janhvi Kapoor : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. याशिवाय ती तिच्या दमदार अभिनयासाठीही प्रसिद्ध आहे. जान्हवी कपूरने अल्पावधीतच इंडस्ट्रीत आपले खास स्थान निर्माण केले आहे. स्टार किड असूनही जान्हवीने आपले स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. पण, तरीही जान्हवी कपूरला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जाते. यूजर्स कधी तिच्या लूकवर, तर कधी तिच्या अभिनयावर कमेंट करताना दिसतात. दरम्यान, जान्हवी कपूरने माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी तिने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

ट्रेंडिंग न्यूज

जान्हवी कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नेपोटिझमवर भाष्य केले आहे. जान्हवी म्हणाली की, ‘हे सगळं ऐकून खूप वाईट वाटतं. कारण स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत लागते. पण, ट्रोल करणारे लोक सहज म्हणतात की, तुला अभिनयच येत नाही. पण, काही लोकांनी मिली चित्रपटातील अभिनायचं कौतुक केलं, ते ऐकून खूप आनंद देखील झाला.’

जान्हवी कपूर पुढे म्हणाली की, 'मलाही कधीकधी वाटतं की, स्टार किड असण्याने माझं नुकसानच अधिक झालं आहे. लोक मनाशी ठरवूनच माझे चित्रपट बघायला येतात. हिला तर सगळं काही सहज मिळालं आहे, असं म्हणतात. मी श्रीदेवीची मुलगी आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण त्याबद्दल मी कधी अहंकार बाळगला नाही. मला फक्त माझ्या आईसारखं व्हायचं आहे. तिच्या सारखा दमदार अभिनय करायचा आहे.’

‘गुंजन सक्सेना’, ‘मिली’ या सारख्या चित्रपटातून दमदार अभिनयाचा जलवा दाखवणारी अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच राजकुमार रावसोबत 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती वरुण धवनसोबत ‘बवाल’ या चित्रपटातही दिसणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग