मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  रिश्ता हो या ना हो मुंबईचा माणूस लगेच मदत करायला तयार; 'सिम्पल आहे ना?' सीरिजचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित

रिश्ता हो या ना हो मुंबईचा माणूस लगेच मदत करायला तयार; 'सिम्पल आहे ना?' सीरिजचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 24, 2024 09:08 AM IST

'सिम्पल आहे ना?' ही नवी मराठी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेत आहे.

रिश्ता हो या ना हो मुंबईचा माणूस लगेच मदत करायला तयार; 'सिम्पल आहे ना?' सीरिजचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित
रिश्ता हो या ना हो मुंबईचा माणूस लगेच मदत करायला तयार; 'सिम्पल आहे ना?' सीरिजचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित

मुंबई म्हणजे मायानगरी! 'मुंबई कधीच झोपत नाही' असे अनेकदा बोलले जाते आणि हे अगदीच खरे आहे. याच जादुई दुनियेच्या रात्रीची सफर घडवणारी 'सिम्पल आहे ना?' ही धमाल वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे. या सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या मायानगरीतील मध्यरात्रीच्या घटना सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

'सिम्पल आहे ना?' या सीरिजच्या २ मिनिटे ४ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये दोन अनोळखी व्यक्तींची शेवटची ट्रेन मिस झाल्याचे दिखवण्यात आले आहे. त्यानंतर इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी झालेली त्यांची रोलरकोस्टर राईड यात पाहायला मिळणार आहे. मध्येच त्यांना मुंबईतील डॉनचा देखील सामना करावा लागत आहे. अशात ओळख नसणारा एक रिक्षाचालक मदतीला धावून आलेला आहे. त्यांचा हा रात्रीचा प्रवास त्यांना शेवटी कुठे घेऊन जाणार हे वेबसिरीज पाहिल्यावरच कळेल. दरम्यान, यात धमाल, इमोशन्स, मैत्री, प्रेम हे सगळंच पाहायला मिळणार आहे. सीरिजचा ट्रेलर पाहाता सर्वांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
वाचा: 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शो नेमकं काय पाहायला मिळणार? नव्या प्रोमोने वेधले सर्वांचे लक्ष

कोणते कलाकार दिसणार?

'सिम्पल आहे ना?' या सीरिजमध्ये सिद्धार्थ खिरीद ,आयुषी भावे टिळक आणि सिद्धार्थ आखाडे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. जेएमएफ मुव्हीज प्रस्तुत, डॉ. राजकुमार एम कोल्हे, डॉ. प्रेरणा राजकुमार कोल्हे निर्मित या वेबसिरीजचे दिग्दर्शन जान्हवी राजकुमार कोल्हेने केले आहे. 'सिम्पल आहे ना?' सीरिजचे लेखन सिद्धार्थ आखाडे यांनी केले आहे. ही वेबसिरीज येत्या १ मे रोजी प्लॅनेट मराठी या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
वाचा: 'प्रायवेट पार्टवर ते उगाच झूम करतात', डान्सर नोरा फतेहीने साधला पापाराजींवर निशाणा

वेबसिरीजच्या दिग्दर्शिका जान्हवी राजकुमार कोल्हे यांनी सीरिजविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणतात, "ही एक मजेशीर, धमाल कॉमेडी वेबसिरीज आहे. ही सीरिज संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र पाहाता येईल. शेवटची ट्रेन सुटल्यानंतर दोन वेगळ्या दिशेला राहाणारे प्रवासी जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय तारांबळ उडते हे सिरीजमध्ये दाखवण्यात येणार आहे. विषय खूपच सिम्पल आहे, परंतु अनोख्या पद्धतीने तो मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही वेबसिरीज प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होईल असा विश्वास आहे."
वाचा: चिन्मय मांडलेकर याच्या निर्णयानंतर दिग्पाल लांजेकरची पहिली प्रतिक्रिया, “महाराजांची भूमिका…”

IPL_Entry_Point

विभाग