मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vaalvi : ‘वाळवी’नंतर या चित्रपटात दिसणार शिवानी सुर्वे

Vaalvi : ‘वाळवी’नंतर या चित्रपटात दिसणार शिवानी सुर्वे

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 18, 2023 04:53 PM IST

Shivani Surve: सध्या शिवानी सुर्वेचा वाळवी हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.

शिवानी सुर्वे
शिवानी सुर्वे (HT)

२०२३ ची सुरुवात वाळवी नावाच्या कमाल सिनेमाने झाली, हा सिनेमा तर आवडतो आहेच, पण यात अभिनेत्री शिवानी सुर्वेच्या भूमिकेचंही कौतुक होतंय. आपल्याला हवं ते साध्य करणारी, त्यासाठी काहीही करायला तयार असलेल्या मुलीच्या व्यक्तिरेखेत शिवानी यात दिसून येत आहे. सुंदर लूक्स आणि सहज अभिनय हे कॉम्बिनेशन या निमीत्ताने पाहायला मिळत आहे. आता शिवानीच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शिवानी सुर्वे ही मराठी कन्नड चित्रपट आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती एकदम वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. शिवानीला वाळवी चित्रपटानंतर पुन्हा एका वेगळ्या चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

वर्षाची सुरुवात इतकी चांगली झाल्यानंतर यंदा शिवानीकडून चाहत्यांना आणखी वेगवेगळ्या सिनेमांची भेट मिळणार आहे. त्या बद्दल शिवानी म्हणते , "२०२२ हे वर्ष खूप बिझी गेलं. 2-3 चित्रपटांचं शूटिंग मी केलं. तर आता हे नवीन वर्ष माझ्यासाठी नवनवीन संधीचं वर्ष आहे असं मी समजते. कारण गेल्या दोन वर्षात जी मी कामं केली होती, ती आता प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या प्रत्येक सिनेमात मी वेगवेगळ्या भूमिका करायला मिळाल्याचं समाधान आहे."

पुढे ती म्हणाली, "त्यात वाळवी नुकताच प्रदर्शित झाला, या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे ही खूप आनंदाची बाब आहे. त्या शिवाय आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा मराठी कन्नडा भाषेत शूट झालेला आणि पॅन इंडिया प्रदर्शित होणारा सिनेमाही माझा यंदा प्रदर्शित होईल."

IPL_Entry_Point

विभाग