मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shantanu Moghe: ‘स्वराज्य रक्षक संभाजी’नंतर पुन्हा एकदा शंतनू मोघे दिसणार शिवरायांच्या भूमिकेत!

Shantanu Moghe: ‘स्वराज्य रक्षक संभाजी’नंतर पुन्हा एकदा शंतनू मोघे दिसणार शिवरायांच्या भूमिकेत!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 19, 2023 11:14 AM IST

Shantanu Moghe as a Chhatrapati Shivaji Maharaj: ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका ऑफएअर झाल्यानंतर देखील शंतनू मोघे पुन्हा एकदा शिवरायांच्या भूमिकेत दिसतील अशी चाहत्यांना आशा होती.

Shantanu Moghe as a Chhatrapati Shivaji Maharaj
Shantanu Moghe as a Chhatrapati Shivaji Maharaj

Shantanu Moghe as a Chhatrapati Shivaji Maharaj: छोट्या पडद्यावरच्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत अभिनेते शंतनू मोघे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. महाराजांचं बोलणं, संयमीपणा, बुद्धीचातुर्य आणि करारी स्वभाव त्यांनी पडद्यावर इतका हुबेहूब साकारला की, साक्षात महाराज समोर असावेत असा भास प्रेक्षकांना होऊ लागलेला. त्यांची ही भूमिका तुफान गाजली होती. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका ऑफएअर झाल्यानंतर देखील शंतनू मोघे पुन्हा एकदा शिवरायांच्या भूमिकेत दिसतील अशी चाहत्यांना आशा होती. आता पुन्हा एकदा शंतनू मोघे 'शिवराय' साकारणार, हे कळल्यानंतर चाहत्यांचा आनंद दुणावला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेते शंतनू मोघे ऐतिहासिक ‘रावरंभा’ या चित्रपटात पुन्हा एकदा ‘छत्रपती शिवाजी महाराज’ साकारताना दिसणार आहे. नुकतीच याची घोषणा करण्यात आली आहे. आज (१९ फेब्रुवारी) सर्वत्र शिव जन्मोत्सव साजरा होत असतानाच, प्रेक्षकांना देखील ही आनंदाची बातमी मिळाली आहे. अद्याप याची अधिकृत घोषणा झाली नसली, तरी मेकर्सनी याचा उलगडा केला आहे. ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटातील पात्र कोण कोण साकारणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. सध्या या चित्रपटातील शंतनू मोघे यांचा एक लूक व्हायरल होत आहे.

‘रावरंभा’ हा प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत असणारा बहुचर्चित, भव्यदिव्य चित्रपट ७ एप्रिल २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘रावरंभा’ची कथा काय आहे?,कोण कोण कलाकार आहेत? हे अद्याप गुलदस्त्यात असताना आता या चित्रपटातील ‘छत्रपती शिवाजी महाराजां’ची भूमिका कोण साकारणार, हे समोर आले आहे. स्वराज्याच्या चौथ्या राजधानीतील म्हणजे शाहूनगरी सातारमधील हा पहिला ऐतिहासिक चित्रपट असून शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुप जगदाळे यांनी सांभाळली आहे.

IPL_Entry_Point