मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mira Rajput Home: शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने वरळीत खरेदी केले नवे घर, किंमत वाचून व्हाल थक्क

Mira Rajput Home: शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने वरळीत खरेदी केले नवे घर, किंमत वाचून व्हाल थक्क

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 03, 2022 11:34 AM IST

Shahid Kapoor New House: मीरा आणि शाहिदने वरळी येथील समुद्र किनारी हे नवे घर खरेदी केले आहे.

मिरा राजपूत
मिरा राजपूत (HT)

बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते आणि लाडके कपल म्हणून अभिनेता शाहिद कपूर व त्याची पत्नी मीरा राजपूतकडे पाहिले जाते. हे कपल नेहमी दोन्ही मुलांना घेऊन फिरताना दिसतात. आता त्यांनी मिशा आणि जैनसाठी वरळी येथे नवे घर खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. त्यांचे हे घर समुद्र किनारी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२०१८मध्ये शाहिद आणि मीराने हे अपार्टमेंट बूक केले होते. २०१९मध्ये त्यांना घराचे पजेशन मिळाले. आता शाहिद आणि मीरा या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले आहेत. मीराने सोशल मीडिया अकाऊंटवर नव्या घरातील फोटो शेअर केले आहेत.
वाचा : मिका सिंगने खरेदी केले खासगी बेट, शेअर केला व्हिडीओ

मीराने इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत, 'कोणाला माहिती ही एक नवीन आणि अविस्मरणीय सुरुवात असेल तर?' या आशयाचे कॅप्शन दिले आहे. दरम्यान, मीराना पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. मीराने संपूर्ण घरात राखाडी रंगाचे फर्निचर केले आहे. तसेच तिचा हा फोटो ड्रॉइंग रुममधील असल्याचे म्हटले जात आहे.

पिंकविलाने सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मीरा आणि शाहिद आता या घरात शिफ्ट होणार आहेत. तसेच ते येथे येऊन पाच दिवस झाले आहेत. त्यांनी पहिल्याच दिवशी एक छोटी पूजा ठेवली होती. त्यानंतर त्यांनी गृहप्रवेश केला आहे. घरातील प्रत्येक कोपरा सजवण्यासाठी मीरा आणि शाहिदने विशेष मेहनत घेतली आहे.

'करोनामुळे त्यांच्या घराचे कंस्ट्रक्शन थांबवण्यात आले होते. पण आता पूर्ण काम झाले आहे. लग्झरी कार आणि बाईकसाठी ओळखला जाणाऱ्या शाहिद कपूरला वरळी येथील थ्री सिक्सटी वेस्ट अपार्टमेंटमध्ये ६ पार्किंग स्लॉट देण्यात आले आहेत. त्याच्या या घराला मोठी बालकनी आहे. ही जवळपास ५०० क्वेअर फूटमध्ये आहे' अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शाहिद आणि मीराच्या या घराची किंमत जवळपास ५८ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.

IPL_Entry_Point

विभाग