मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Satvya Mulichi Satavi Mulgi: अद्वैतला कळेल का नेत्राच्या दिव्यशक्तीबद्दल? मालिकेत नवे वळण

Satvya Mulichi Satavi Mulgi: अद्वैतला कळेल का नेत्राच्या दिव्यशक्तीबद्दल? मालिकेत नवे वळण

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 10, 2023 06:38 PM IST

Satvya Mulichi Satavi Mulgi: नेत्राच्या दिव्यशक्तीबद्दल कळल्यावर काय असेल अद्वैतची प्रतिक्रिया? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सातव्या मुलीची सातवी मुलगी
सातव्या मुलीची सातवी मुलगी (HT)

आपल्याला नेहमीच भविष्यकाळात काय घडणार या विषयी कुतूहल असतं आणि भविष्य आपल्याला दिसू लागलं तर त्याचं आश्चर्यच वाटेल. अगदी असंच सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील नेत्राच्या आयुष्यात घडतंय. नेत्रा भविष्यात जे घडणार आहे, त्याबद्दल बोलते कारण आई त्रिनयना देवीचं वरदान तिला लाभलाय. ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे, आता ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेत्रा राजाध्यक्षांचं घर सोडून जाते पण ती बसमध्ये चढणार एवढ्यात तिला संकेत मिळतो, कन्स्ट्रक्शन साईटवर अव्दैतचा अपघात होणार आहे. नेत्रा जीवाची बाजी लावून अव्दैतला वाचवते. तेव्हा शेखरची खात्री पटते की, नेत्राला अव्दैतपासून दूर करून आपण चूक करत आहोत.
वाचा: पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खान की नोरा फतेही? कोणाला डेट करतोय आर्यन खान

शेखर नेत्राला घरी घेऊन येतो. शेखर घरी सगळ्यांना सांगतो की, नेत्राला भविष्यातील घटना दिसतात त्यामुळे सगळे आश्चर्यचकीत होतात. आता नेत्राच्या दिव्यशक्तीबद्दल कळल्यावर काय असेल अद्वैतची प्रतिक्रिया? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

IPL_Entry_Point

विभाग