मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Satvya Mulichi Satavi Mulagi: त्रिनयना देवीच्या प्रकटदिनी नेत्रावर कोणते संकट येणार?

Satvya Mulichi Satavi Mulagi: त्रिनयना देवीच्या प्रकटदिनी नेत्रावर कोणते संकट येणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 25, 2023 03:28 PM IST

Zee Marathi new Serial: त्रिनयना देवीच्या प्रकटदिनादिवशी नेमकं काय घडणार, रूपाली आणि इंद्राणी मिळून कसा डाव साधणार? असे अनेक प्रश्न पडले आहेत.

सातव्या मुलीची सातवी मुलगी
सातव्या मुलीची सातवी मुलगी

छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे गृहिणीच्या आवडीचा विषय. कित्येक घरात संध्याकाळी केवळ मालिकाच पाहायला मिळतात. त्यामुळेच नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याकडे निर्मात्यांचा कल असतो. सध्या झी मराठी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रूपालीला कळतं की इंद्राणीला नेत्राच्या मनातलं ऐकू येत नाही. त्यामुळे रूपालीचा संताप होतो. ती इंद्राणीला घर सोडून जायला सांगते. इंद्राणी घर सोडून जात असताना ममताचा आत्मा येऊन तिला रोखतो. ममता इंद्राणीला जाऊ नको, असं सांगते. इंद्राणीला याचं आश्चर्य वाटतं. नेत्रा विचार करते की ममताने नेमकं काय इंद्राणीला सांगितलं असेल.

नेत्रा या विचारात असताना अव्दैत तिला आपल्यासोबत घेऊन जातो. दुसरीकडे रागावलेल्या रूपालीला शांत करण्यासाठी इंद्राणी तिला त्रिनयना देवीच्या प्रकटदिनाविषयी सांगते. प्रकटदिनादिवशी हळद-कुंकू ओलांडलं गेलं तर देवीची अवकृपा होईल आणि त्याचा नेत्राला त्रास होईल, कदाचित नेत्राची दिव्यशक्ती, तिला संकेत दिसणं, हे सगळं कायमचं बंद होईल. असं इंद्राणी रूपालीला सांगते.

त्रिनयना देवीच्या प्रकटदिनादिवशी नेमकं काय घडणार, रूपाली आणि इंद्राणी मिळून कसा डाव साधणार, आणि नेत्रा हळदी-कुंकू ओलांडणार का... हे लवकरच सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत पहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग