Sanjay Dutt In Baahubali: ‘बाहुबली’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर आजही ब्लॉकबस्टर म्हटले जाते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाच्या कथानकाला जितकी पसंती मिळाली, तितकीच या चित्रपटातील कलाकारांना देखील प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘बाहुबली’ या चित्रपटात ‘कटप्पा’ नावाचं एक पात्र होतं. चित्रपटातील हे पात्र अभिनेते सत्यराज यांनी साकारले होते. मात्र, सुरुवातीला या भूमिकेसाठी बॉलिवूडचा संजू बाबा अर्थात अभिनेता संजय दत्त याला विचारणा झाली होती. या चित्रपटात ‘कटप्पा’ म्हणून संजय दत्त याला घेण्याचे निर्मात्यांच्या मनात होते.
साऊथ स्टार प्रभास याची मुख्य भूमिका असलेला ‘बाहुबली’ हा चित्रपट तुफान गाजला होता. या चित्रपटाने जगभरात ५७० कोटींहून अधिक कमाई केली होती. मात्र, या चित्रपटाच्या शेवटी एक प्रश्न सगळ्यांनीच विचारला होता. या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी चाहत्यांना ‘बाहुबली २’ची वाट बघावी लागली होती. ‘बाहुबली २’ या चित्रपटाने प्रेक्षकांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर दिलेच, पण जगभरातील बॉक्स ऑफिसवर धमाल करत तब्बल १७८८ कोटी रुपयांची कमाई केली. ‘बाहुबली १’ हा चित्रपट पाहिल्यानंतर 'कट्टप्पाने बाहुबलीला का मारले?' हा प्रश्न जगभरातील प्रेक्षकांना पडला होता. कट्टप्पाशी संबंधित या प्रश्नामुळेच 'बाहुबली २'ने बंपर कमाई केली होती.
या चित्रपटात ‘कटप्पा’ची भूमिका अभिनेता सत्यराज यांनी साकारली होती. पण, या भूमिकेसाठी सत्यराज यांना पहिली पसंती नव्हती. निर्मात्यांना या चित्रपटातील ‘कटप्पा’च्या भूमिकेसाठी पहिला संजय दत्त याला कास्ट करायचे होते. ‘रेडीफ’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल बोलत असताना, एसएस राजामौली यांचे वडील आणि चित्रपट लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी हा खुलासा केला होता.
या विषयी बोलताना विजयेंद्र प्रसाद यांनी म्हटले की, बाहुबलीच्या भूमिकेसाठी प्रभासच्या नावाला नेहमीच त्यांची पहिली पसंती होती. मात्र, कट्टप्पाच्या भूमिकेसाठी संजय दत्त त्यांच्या मनात होता. मात्र, त्यावेळी अभिनेता संजय दत्त तुरुंगात होता. त्यामुळे त्याला चित्रपटात कास्ट करणे शक्य झाले नाही. त्यानंतर या भूमिकेसाठी अभिनेते सत्यराज हे दुसरा पर्याय होते. त्यामुळे नंतर सत्यराज यांची निवड करण्यात आली. ‘बाहुबली’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘कट्टप्पा’चे पात्र सर्वांच्या मनात घर करून राहिले. पहिल्या भागातील एका प्रश्नाने दुसऱ्या भागाची क्रेझ निर्माण केली.
संबंधित बातम्या