मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Suhani Bhatnagar Death: अधुरंच राहिलं सुहानी भटनागरचं ‘ते’ स्वप्न! काय होती अभिनेत्रीची इच्छा?

Suhani Bhatnagar Death: अधुरंच राहिलं सुहानी भटनागरचं ‘ते’ स्वप्न! काय होती अभिनेत्रीची इच्छा?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 18, 2024 08:14 AM IST

Suhani Bhatnagar Death: सुहानीला अखेरचा निरोप देताना तिच्या आई-वडिलांनी आपल्या लेकीची शेवटची इच्छा मीडियाला सांगितली. स्वतःचं स्वप्न पूर्ण करता करताच सुहानी भटनागरने या जगाचा निरोप घेतला.

Suhani Bhatnagar Death
Suhani Bhatnagar Death

Suhani Bhatnagar Death: बॉलिवूड चित्रपट ‘दंगल’ फेम अभिनेत्री सुहानी भटनागर हिने वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. सुहानीचे एकच स्वप्न होते, जे पूर्ण करण्यासाठी ती खूप प्रयत्न करत होती. तिला संधीही मिळाली होती. पण, नशिबाने साथ दिली नाही आणि ती एक अपूर्ण इच्छा ठेवून हे जग सोडून गेली. सुहानीला अखेरचा निरोप देताना तिच्या आई-वडिलांनी आपल्या लेकीची शेवटची इच्छा मीडियाला सांगितली. स्वतःचं स्वप्न पूर्ण करता करताच सुहानी भटनागरने या जगाचा निरोप घेतला.

मीडियाशी बोलताना सुहानी भटनागरच्या आईने सांगितले की, त्यांना त्यांच्या मुलीचा खूप अभिमान आहे. त्यांच्या मुलीला अर्थात सुहानीला लहानपणापासूनच मॉडेलिंगची आवड होती. 'दंगल' चित्रपटाचा संदर्भ देताना सुहानीच्या आईने म्हटले की, या चित्रपटासाठी तब्बल २५००० मुलांमधून त्यांच्या मुलीची निवड करण्यात आली होती. सुहानी लहानपणापासूनच कॅमेरा फ्रेंडली होती. तिला अभिनयाची आवड होती. मात्र, तिच्या सगळ्या इच्छा आणि स्वप्न अपूर्ण राहिली.

Suhani Bhatnagar Death: विश्वास बसत नाहीये; ऑनस्क्रीन लेकीच्या निधनानंतर आमिर खानची भावूक पोस्ट

पत्रकारितेचा कोर्स करत होती सुहानी

सुहानीच्या आईने तिच्याबद्दल सांगताना म्हटले की, त्यांची मुलगी जनसंवाद आणि पत्रकारितेचा कोर्स करत होती. हे तिच्या शिक्षणाचे दुसरे वर्ष होते. सुहानीची इच्छा होती की, तिने आधी आपले शिक्षण पूर्ण करावे आणि नंतर चित्रपटात दमदार पुनरागमन करावे. सुहानी भटनागरने ‘दंगल’ चित्रपटानंतर स्वतःला मोठ्या पडद्यापासून दूर ठेवले होते. एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितले होते की, सध्या तिला तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यानंतरच ती चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार आहे. मात्र, सुहानीचं हे स्वप्न अपूर्णच राहिलं.

सुहानी भटनागरने १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, सुपरस्टार आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसनेही एका पोस्टद्वारे सुहानीला श्रद्धांजली वाहिली.

सुहानीला काय झालं होतं?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री सुहानी भटनागर हिचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. तिच्यावर उपचार देखील सुरू होते. या उपचारादरम्यान सुहानी काही औषधे घेत होती. मात्र, औषधाच्या दुष्परिणामांमुळे सुहानी भटनागरच्या शरीरात हळूहळू पाणी साठू लागले. यामुळे तिची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी तिला दिल्लीतील एम्स रूग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, उपचारांदरम्यानच तिने अखेरचा श्वास घेतला. शनिवारी, १७ फेब्रुवारी रोजी सुहानी भटनागर हिने जगाचा निरोप घेतला.

WhatsApp channel