Who Is Bhavna Chauhan: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या एका टीव्ही जाहिरातीमुळे चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे या टीव्ही जाहिरातीत रणवीर सिंहसोबत ॲडल्ट स्टार जॉनी सिन्स देखील झळकला आहे. याच जाहिरातीत त्यांच्यासोबत झळकलेली टीव्ही अभिनेत्री भावना चौहान ही देखील चांगलीच प्रसिद्धी मिळवत आहे. टीव्हीवरची ही जाहिरात पाहिल्यानंतर सर्वांनाच भावना चौहानबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. मात्र, काही लोक या जाहिरातीनंतर अभिनेत्रीला ट्रोल देखील करत आहेत.
ॲडल्ट स्टार्स जॉनी सिन्स आणि रणवीर सिंहसोबत जाहिराती करणारी टीव्ही अभिनेत्री भावना चौहान बऱ्याच काळापासून मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा यांच्या 'हसी तो फसी में' या चित्रपटात तिने छोटीशी सहाय्यक भूमिका साकारली होती. याशिवाय अभिनेत्री भावना चौहान चित्रपट दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या 'शिकारा' या चित्रपटातही दिसली आहे. मात्र, तिला या चित्रपटांमधून फारशी ओळख मिळू शकली नाही.
भावना चौहानने 'रझिया सुलतान' या टीव्ही शोमध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला होता. पण, भावना चौहानला खरी प्रसिद्धी मिळाली, ती रणवीर सिंह आणि जॉनी सिन्ससोबतच्या टीव्ही जाहिरातीतूनच... या जाहिरातीने भावनाचे नशीब पालटले. भावनाच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे लोक दिवाने झाले आहेत. दुसरीकडे, अनेक सोशल मीडिया यूजर्स भावना चौहानला या जाहिरातीमुळे ट्रोलही करत आहेत. टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईनेही या जाहिरातीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. एक लांबलचक पोस्ट लिहिताना तिने हा टीव्ही इंडस्ट्रीचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे, सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर भावना चौहान आपण जॉनी सिन्सला जॉन सीना समजून ही जाहिरात केल्याचे म्हटले आहे. ती म्हणाली की, 'मला माहित नाही की, मी नाव चुकीचे का वाचले. पण, जॉनी अशा जाहिरातीत भाग घेईल, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. मला वाटले की, भारतात परदेशी कुस्तीपटू खूप काम करतात आणि तो अभिनेता जॉन सीना असेल. पण मीच मूर्खपणा केला. मला नंतर कळले की, जॉनी सिन्स जॉन सीना नाही.’