मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pushpa 2: समंथा रुथ प्रभूने नाकारली ‘पुष्पा २’ची तगडी ऑफर! नक्की कारण तरी काय?

Pushpa 2: समंथा रुथ प्रभूने नाकारली ‘पुष्पा २’ची तगडी ऑफर! नक्की कारण तरी काय?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 18, 2023 01:35 PM IST

Samantha Ruth Prabhu Denied Pushpa 2 Offer: समंथाला ‘पुष्पा २’ या चित्रपटात देखील एका आयटम साँग करण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र, अभिनेत्रीने ती ऑफर नाकारल्याचे म्हटले जात आहे.

Samantha Ruth Prabhu
Samantha Ruth Prabhu

Samantha Ruth Prabhu Denied Pushpa 2 Offer: साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा: द राईज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. या चित्रपटातील ‘ऊ अंटवा..’ हे आयटम साँग देखील प्रचंड गाजले होते. ‘पुष्पा’ चित्रपटाच्या या गाण्यातील समंथा रुथ प्रभू आणि अल्लू अर्जुन यांची केमिस्ट्री चाहत्यांनाप्रचंड आवडली होती. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘पुष्पा २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते देखील यासाठी उत्सुक होते. मात्र, त्या आधीच समंथाने या चित्रपटाला नकार देत चाहत्यांना धक्का दिला आहे.

'पुष्पा २'मध्ये समंथा प्रभूचा आयटम नंबर दिसणार नाहीये. 'पुष्पा २' अर्थात ‘पुष्पा: द रूल’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी समंथाला या चित्रपटात देखील एका आयटम साँग करण्याची ऑफर दिली होती. मात्र, अभिनेत्रीने ती ऑफर नाकारल्याचे म्हटले जात आहे. ‘पुष्पा २’मध्ये समंथाचे गाणे नसणार, हे कळताच चाहत्यांनी देखील नाराजीचा सूर आळवला आहे. समंथाने देखील विचारपूर्वक हा मोठा निर्णय घेतला आहे.

'पुष्पा २' मधील आयटम साँगसाठी समंथाला मोठी रक्कम देखील ऑफर करण्यात आली होती. ‘पुष्पा २’ मधील ३ मिनिटांच्या गाण्यासाठी समंथाला ५ कोटी रुपये ऑफर करण्यात आले होते, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. मात्र, दिग्दर्शक सुकुमारने वारंवार विनंती करूनही समंथाने ही ऑफर स्वीकारली नाही. समंथा रुथ प्रभूला तिच्या करिअरच्या या टप्प्यावर कोणत्याही आयटम साँगमध्ये काम करण्याची इच्छा नसल्याचे म्हटले जात आहे. मात्र, समंथाच्या या नकारानंतर तिला या चित्रपटात छोट्या भूमिकेची ऑफरही आली होती. त्याबद्दल अभिनेत्रीने नेमका काय निर्णय घेतला हे समोर आलेले नाही.

'पुष्पा' या चित्रपटामध्ये समंथाने तिच्या 'ऊ अंटवा' या आयटम साँगमधून आपल्या अदांची जादू दाखवली आहे. समंथाच्या या गाण्याचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले होते. आजही या गाण्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. सध्या अभिनेत्री अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. समंथा तिच्या आगामी मेगा बजेट चित्रपटांच्या तयारीत व्यस्त आहे. अभिनेत्री लवकरच 'शाकुंतलम' चित्रपटात दिसणार आहे.

IPL_Entry_Point