मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  १२ राशींच्या व्यक्तींची तुफान धमाल; 'आलंय माझ्या राशीला' चित्रपटात धनश्री कदमची वर्णी!

१२ राशींच्या व्यक्तींची तुफान धमाल; 'आलंय माझ्या राशीला' चित्रपटात धनश्री कदमची वर्णी!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 18, 2023 02:46 PM IST

Aalay Mazya Rashila: प्रत्येक राशींची काही स्वभाववैशिष्ट्ये, सौंदर्य आहेत. याच सौंदर्याची गंमत दाखविणारा, राशींच्या उत्सुकतेला अभ्यासाच्या आणि विज्ञानाच्या आधारे जोडणारा चित्रपट म्हणजे ‘आलंय माझ्या राशीला.’

Dhanashree Kadam
Dhanashree Kadam

Alay Mazya Rashila : प्रत्येक राशींची काही स्वभाववैशिष्ट्ये, सौंदर्य आहेत. या वैशिष्ट्यांचा मानवी जीवनावर खूप मोठा प्रभाव असतो. याच सौंदर्याची गंमत दाखविणारा, राशींच्या उत्सुकतेला अभ्यासाच्या आणि विज्ञानाच्या आधारे जोडणारा चित्रपट म्हणजे ‘आलंय माझ्या राशीला.’ हा मराठी चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील कलाकारांची दाद द्यावी तितकी कमीच. प्रेक्षकांची पसंती मिळवत आलेला हा चित्रपट 'आनंदी वास्तू' आणि 'साईकमल प्रोडक्शन' निर्मित आहे. या चित्रपटात अभिनेत्री धनश्री कदम मध्यवर्ती भूमिकेत असून विविध राशींच्या गमतीजमती त्यांची वैशिष्ट्य आपल्याला चित्रपटातून जाणून घेता येत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

धनश्रीने या चित्रपटात राधा हे पात्र साकारलं आहे. प्रत्येक राशींच्या असलेल्या स्वभाववैशिष्ट्यांवर हा चित्रपट भाष्य करतो. सौंदर्याची गंमत दाखविणारा, राशींच्या उत्सुकतेला अभ्यासाच्या आणि विज्ञानाच्या आधारे जोडणारा ‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटाचं दिग्दर्शन अजित शिरोळे यांनी केलं आहे. सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर व अश्विनी पिंपळकर यांनी चित्रपटाची निर्माती केली आहे.

अभिनेत्री धनश्री कदम सोबत या चित्रपटात अलका कुबल, मोहन जोशी, निर्मिती सावंत, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, प्रणव पिंपळकर, मंगेश देसाई, उषा नाईक यांच्या दमदार भूमिका पाहायला मिळत आहेत.

एकूणच चित्रपटाबाबतचा अनुभव सांगत असताना धनश्री असे म्हणाली की, ‘आलंय माझ्या राशीला' चित्रपटात काम करण्याची मिळालेली संधी माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे. आणि ही संधी मला चित्रपटाचे निर्माते आनंद पिंपळकर सरांनी दिली त्यासाठी मी त्यांचीही आभारी आहे. या चित्रपटात मी राधा नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी आव्हानात्मक होत. विलन असलेल्या या माझ्या भूमिकेला मी १००% न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.’ भविष्यात ऐतिहासिक चित्रपटात काम करायची इच्छा तिने दर्शवली आहे.

IPL_Entry_Point