Shehzada: पठाण, दंगल अन् केजीएफला मागे टाकत कार्तिकच्या ‘शहजादा’नं मिळवलं सर्वाधिक IMDb रेटिंग!
Shehzada IMDb Rating: बॉक्स ऑफिसवर ‘शहजादा’ या चित्रपटाला संथ सुरुवात मिळाली असली, तरी आयएमडीबीवर या चित्रपटाची जादू दिसली आहे.
Shehzada IMDb Rating: बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांचा ‘शहजादा’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने संथ सुरुवात केली असली, तरी या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने आयएमडीबी रेटिंगमध्ये देखील दमदार रेटिंग मिळवले आहे. ‘पठाण’, ‘बाहुबली २’, ‘दंगल’ आणि ‘केजीएफ चॅप्टर २’सारख्या चित्रपटांनाही मागे टाकत ‘शहजादा’ या चित्रपटाने सर्वाधिक IMDb रेटिंग मिळवले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला संथ सुरुवात मिळाली असली, तरी आयएमडीबीवर या चित्रपटाची जादू दिसली आहे. कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन यांच्या ‘शहजादा’ या चित्रपटाला एकूण ९ इतके आयएमडीबी रेटिंग मिळाले आहे. एकूण १०,०६० युजर्सपैकी, ६६.७% IMDb वापरकर्त्यांनी या चित्रपटाला १०चे रेटिंग दिले आहे. तर, १८.१% लोकांनी ९% रेट केले आहे. ८.३% लोकांनी ८ रेट केले आणि ५.३% लोकांनी १ रेटिंग दिले आहे. अशाप्रकारे या चित्रपटाचे एकूण सरासरी रेटिंग ९ इतके झाले आहे.
कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ हा चित्रपट अल्लू अर्जुनचा साऊथ चित्रपट ‘अलवैकुंठपुरम’चा रिमेक आहे. रोहित धवनने याचे दिग्दर्शन केले आहे. कार्तिक आणि क्रितीशिवाय या चित्रपटात परेश रावल, मनीषा कोईराला आणि रोनित रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘लुकाछुपी’नंतर पुन्हा एकदा कार्तिक-क्रितीची ही जोडी मोठ्या पडद्यावर अप्रतिम दिसत आहे. दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पाहून चाहते अक्षरशः जल्लोष आहेत.
कार्तिक आर्यन हा सध्या नव्या चित्रपटांच्या कामात अतिशय व्यस्त आहे. २०२२ हे वर्ष कार्तिकसाठी खूपच लकी ठरले होते. २०२२मध्ये यावर्षी त्याचा 'भूल भुलैया २' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. यानंतर कार्तिककडे चित्रपटांची रांग लागली. ‘भूल भुलैय्या २’ आणि ‘फ्रेडी’, ‘शहजादा’नंतर ‘हेरा फेरी ३’ आणि या वर्षीच्या काही बहुचर्चित चित्रपटांमध्ये कार्तिक मुख्य भूमिकेत दिसणार आहे.