Shehzada Collection: कार्तिक आर्यनची जादू पडली फिकी; ‘शहजादा’चं फर्स्ट डे कलेक्शन केवळ इतकंच!
Shehzada Box Office Collection Day 1: कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ हा चित्रपट अल्लू अर्जुनचा साऊथ चित्रपट ‘अलवैकुंठपुरम’चा रिमेक आहे. रोहित धवनने याचे दिग्दर्शन केले आहे.
Shehzada Box Office Collection Day 1: एकीकडे ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना, आता कार्तिक आर्यनचा ’शहजादा’ देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकलेला नाही. या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर आधीच जोरदार चर्चा सुरू आहे. ‘शहजादा’ला टक्कर देण्यासाठी हॉलिवूडचा ‘अँटमॅन ३’ही रिलीज झाला आहे. दरम्यान आता कार्तिकच्या ‘शहजादा’चे पहिल्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ देशभरात ३००० हजारांहून अधिक स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. 'भूल भुलैया २'च्या यशानंतर कार्तिककडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. ‘शहजादा’ हा चित्रपट 'भूल भुलैया २'च्या ओपनिंग डे कलेक्शनच्या निम्मीही कमाई करू शकणार नाही, असा अंदाज आगाऊ बुकिंगवरून वर्तवण्यात आला होता. अखेर हा अंदाज खरा ठरला आहे. हॉलिवूड चित्रपट ‘अँटमॅन ३‘ने ‘शहजादा’पेक्षा जास्त कलेक्शन केले आहे. या चित्रपटातून निर्माता म्हणून पदार्पण करणाऱ्या कार्तिक आर्यन तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचाही काहीसा परिणाम या कलेक्शनवर झाला आहे.
क्रिती सेनन आणि कार्तिक आर्यन स्टारर या चित्रपटाकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा होत्या, पण कमाईच्या आकड्यावरून ते साध्य झाल्याचे दिसत नाहीये. पहिल्या दिवसाच्या अंदाजे आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी अवघी ७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट ८० कोटींपेक्षा अधिक झाले आहे. कार्तिकच्या ‘भूल भुलैय्या २’ने पहिल्याच दिवशी १४ कोटींची कमाई केली आहे.
कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ हा चित्रपट अल्लू अर्जुनचा साऊथ चित्रपट ‘अलवैकुंठपुरम’चा रिमेक आहे. रोहित धवनने याचे दिग्दर्शन केले आहे. कार्तिक आणि क्रितीशिवाय या चित्रपटात परेश रावल, मनीषा कोईराला आणि रोनित रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘लुकाछुपी’नंतर पुन्हा एकदा कार्तिक-क्रितीची ही जोडी मोठ्या पडद्यावर अप्रतिम दिसत आहे.