मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  NTR 30: जान्हवी कपूर पाठोपाठ सैफ अली खाननेही सुरू केलं ‘एनटीआर ३०’चं शूटिंग! फोटो आले समोर...

NTR 30: जान्हवी कपूर पाठोपाठ सैफ अली खाननेही सुरू केलं ‘एनटीआर ३०’चं शूटिंग! फोटो आले समोर...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 18, 2023 12:45 PM IST

Saif Ali Khan In NTR 30: साऊथ स्टार अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि सैफ अली खानचे ‘एनटीआर ३०’च्या सेटवरील फोटो समोर आले आहेत.

Saif Ali Khan In NTR 30
Saif Ali Khan In NTR 30

Saif Ali Khan In NTR 30: सध्या दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआर याचा ‘एनटीआर ३०’ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूर साऊथ मनोरंजन विश्वात पदार्पण करणार आहे. तर, आता या चित्रपटात अभिनेता ज्युनियर एनटीआरसोबत सैफ अली खानही धमाल करताना दिसणार आहे. ज्युनियर एनटीआर आणि त्यांच्या टीमने ‘एनटीआर ३०’ चित्रपटाच्या सेटवर सैल अली खानचे स्वागत केले आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेता सैफ अली खान आणि ज्युनियर एनटीआरचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

साऊथ स्टार अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि सैफ अली खानचे ‘एनटीआर ३०’च्या सेटवरील फोटो समोर आले आहेत. दोघांचे हे फोटो पाहून चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या फोटोमध्ये दोघेही अगदी खास मित्रांसारखे एकमेकांसोबत गप्पा मारत बसताना दिसले आहेत. ‘एनटीआर ३०’च्या शूटला सुरुवात करण्यापूर्वीच सैफ अली खान त्याच्या या आगामी चित्रपटाच्या सेटवर पोहोचला होता.

ज्युनियर एनटीआर आणि सैफ अली खान यांच्या या फोटोंमध्ये पहिल्या फोटोत दोघेही उभे राहून एकमेकांसोबत फोटो पोज देताना दिसत आहेत. तर, दुसऱ्या एका फोटोत सैफ अली खान आणि ज्युनियर एनटीआर गप्पा मारताना दिसत आहेत. तर, तिसर्‍या फोटोत दोन्ही स्टार्स चहा कॉफीचा आनंद घेताना दिसत आहेत. ‘एनटीआर ३०’ या चित्रपटात जान्हवी कपूर आणि सैफ अली खान हे बॉलिवूड कलाकार देखील दिसणार आहे. हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि इतर अनेक दक्षिण भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘एनटीआर ३०’ या चित्रपटात ज्युनियर एनटीआर दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाची शूटिंग २३ फेब्रुवारीपासून सुरू झाले असून, हा चित्रपट २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आरआरआर’ हा चित्रपट केल्यानंतर जवळपास २ वर्षांनी ज्युनियर एनटीआर या चित्रपटात दिसणार आहे. जान्हवी कपूरही या चित्रपटातून तेलुगुमध्ये पदार्पण करणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग