मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: ‘नाटू नाटू’चा जगभरात बोलबाला; अवघ्या १९ सेकंदाच्या ‘या’ खास क्षणाला मिळाले ३० मिलिअन व्हूज!

Viral Video: ‘नाटू नाटू’चा जगभरात बोलबाला; अवघ्या १९ सेकंदाच्या ‘या’ खास क्षणाला मिळाले ३० मिलिअन व्हूज!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 12, 2023 12:08 PM IST

RRR Golden Globe Viral Video: गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये ‘आरआरआर’ चित्रपटाने पुरस्कार पटकावला आहे. यावेळी जेव्हा पुरस्काराची घोषणा झाली, तेव्हा चित्रपटाची संपूर्ण टीम या सोहळ्याला हजर होती.

RRR Golden globe award
RRR Golden globe award

RRR Golden Globe Viral Video:आरआरआर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिससह आता पुरस्कार सोहळ्यात देखील धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात देखील भारताचे नाव गाजवत आहे. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळालेल्या एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाने एका श्रेणीत पुरस्कार देखील पटकावला आहे. यानंतर या चित्रपटाचे जगभरातून कौतुक होत आहे. दरम्यान या सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये ‘आरआरआर’ चित्रपटाने पुरस्कार पटकावला आहे. यावेळी जेव्हा पुरस्काराची घोषणा झाली, तेव्हा चित्रपटाची संपूर्ण टीम या सोहळ्याला हजर होती. पुरस्कार जाहीर होताच संपूर्ण टीममध्ये एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळाला. या क्षणाचा एक छोटासा व्हिडीओ सध्या इंटरनेट विश्वात व्हायरल होत आहे. अवघ्या १९ सेकंदाच्या या व्हिडीओने काही तासांतच तब्बल ३० मिलियन व्हूज मिळवले आहेत.

एसएस राजामौलींचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘RRR’ दोन श्रेणींमध्ये गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकित झाला होता. 'RRR' चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट मूळ गाणे मोशन पिक्चर कॅटेगरी'साठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. ‘आरआरआर’ या चित्रपटातील 'नाटू नाटू' हे गाणे जगभरात खूपच गाजले आहे. भारतीय चित्रपटाला या श्रेणीत पहिल्यांदाच गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ स्वीकारण्यासाठी ‘आरआरआर’चे दिग्दर्शक एसएस राजामौली, अभिनेता राम चरण, जूनियर. एनटीआर आणि त्यांची पत्नी सध्या या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते.

‘आरआरआर’ या चित्रपटात साऊथ सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासह बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली आहेत.

IPL_Entry_Point

विभाग