मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी नव्या दाव्यानंतर रिया चक्रवर्तीची पोस्ट

Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी नव्या दाव्यानंतर रिया चक्रवर्तीची पोस्ट

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 27, 2022 05:28 PM IST

Sushant Sigh Rajput Case: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणातील एक व्हिडीओ समोर आल्याने खळबळ माजली आहे. अशातच रियाने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

रिया चक्रवर्ती
रिया चक्रवर्ती (HT)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला सध्या वेगळे वळण आले आहे. कूपर रुग्णालयात सुशांतच्या पोस्टमॉर्टनच्या वेळी उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्याने सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला आहे. तसेच शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने ४४ कॉल आल्याचे लोकसभेत सांगितले. ‘AU’ म्हणजे आदित्य ठाकरे असे सांगितले होते. अशातच आता सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची पोस्ट चर्चेत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. 'तुम्ही आगीवर चालला आहात, अनेक शत्रूंचा सामना केला आहे, पुरामध्ये देखील तुम्ही तुमचा जीव वाचवला आहे. त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला स्वत:च्या ताकदीवर शंका निर्माण होईल या गोष्टी आठवा' या आशयाची पोस्ट रियाने केली आहे. तिच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: सुशांतच्या मृत्यूचे गूढ वाढले! आता वकीलही म्हणतात, ती आत्महत्या नव्हती!

रिया चक्रवर्ती पोस्ट
रिया चक्रवर्ती पोस्ट (HT)

काही दिवसांपूर्वी रियाच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम खुलत असल्याचे म्हटले जात होते. तिच्या नव्या बॉयफ्रेंडची चर्चा रंगली होती. हिंदुस्तान टाइम्सला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बंटी आणि रिया हे एकत्र आहेत. ते खूश आहेत. दोघांना एकत्र पाहून आम्हाला आनंद होत आहे. गेल्या काही दिवसांपासून रिया कठीण काळातून जात होती. त्या काळात बंटीने तिला पाठिंबा दिला. आता ते दोघे एकत्र आनंदी आहेत.'

रिया ही बंटीची क्लाइंट होती. सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर जेव्हा रियाची चौकशी झाली तेव्हा बंटीला देखील बोलवण्यात आले होते. बंटी सजदेह हा सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी सीमाचा भाऊ आहे. तो कॉर्नरस्टोन स्पोर्ट कंपनीचा सीईओ आहे. ही कंपनी विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन, इतर काही लोकांची कामे पाहातो.

IPL_Entry_Point

विभाग