Rang Maza Vegla Latest Update: ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत आता प्रेक्षकांना मोठा धमाका पाहायला मिळणार आहे. आता १४ वर्षांनंतर पुन्हा एकदा या कथेत व्हिलन आयेशाची एन्ट्री होणार आहे. मालिकेच्या कथानकातील हा ट्वीस्ट या मालिकेला एका वेगळ्याच वळणावर घेऊन जाणार आहे. नुकताच या मालिकेचा एक नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात आयेशाची झलक पाहायला मिळाली आहे. एकीकडे कार्तिक दीपाचा बदला घेत असताना, आता आयेशाची एन्ट्री झाल्याने एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे.
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेचं कथानक आता १४ वर्षांनी पुढे गेलं आहे. या लीपनंतर आता मालिकेचं कथानक पुढे गेलं आहे. एकीकडे कार्तिक तुरुंगातून बाहेर आला आहे. तर, दुसरीकडे दीपाने कार्तिकी आणि दीपिकाला एकटीने वाढवले आहे. १४ वर्षांच्या या लीपनंतर आता कार्तिक शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आला आहे. यानंतर आता मालिकेत आयेशा देखील परतणार आहे. आयेशाच्या येण्यामुळे आता एक नवी खेळी सुरू आहे.
कार्तिक आणि दीपाच्या मुली अर्थात दीपिका आणि कार्तिकी यांनी देखील आता तारुण्यात पदार्पण केलं आहे. त्यांच्या आयुष्यात देखील आता हिरोची एन्ट्री झाली आहे. त्यांच्या आयुष्यातील खास व्यक्ती अर्थात आर्यन हाच आता आयेशा नावाचं वादळ पुन्हा एकदा घेऊन येणार आहे. आयेशा ही आर्यनची मावशी असून, तिचा बदला घेण्यासाठीच आर्यन इनामदार कुटुंबाच्या जवळ गेल्याचे समोर येणार आहे. पुन्हा एकदा आयेशाची नजर कार्तिक पडणार असून, ती त्याला परत मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.
मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत सध्या बदल्याचा खेळ सुरू झाला आहे. १४ वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आलेला कार्तिक आता दीपाचा बदला घेणार आहे. त्याचा हा डाव आता सुरू झाला आहे. आपल्याला शिक्षा दीपामुळेच झाली अशी मनाशी पक्की खुणगाठ बांधलेला कार्तिक आता दीपाला शक्य तितका त्रास देण्याचा प्रयत्न करणार आहे. यात आता तो आयेशाची साथ घेणार का?, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळणार आहे.
संबंधित बातम्या