Mrunal Thakur Workout Video: ‘सीतारामम’ फेम अभिनेत्री मृणाल ठाकुर ही अतिशय फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे. ती नेहमीच आपले वर्कआऊट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आता या सिझलिंग वर्क आऊट व्हिडीओंनी सध्या सोशल मीडियाचं तापमान नक्कीच वाढवलं आहे. मृणाल ठाकुर आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करतेच. मात्र, यासोबतच ती तिच्या ग्लॅमरवर देखील फोकस ठेवते. तिचे वर्क आऊट व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
मृणालने काही दिवसांपूर्वी तिच्या जिम डायरीतील एक छोटा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती अॅनिमल फ्लो वर्कआऊटसह ती पुशअप्स आणि डंबेल करताना देखील दिसली. या व्हिडीओमध्ये, अभिनेत्री डंबेल वर्कआऊटसह तिच्या फिटनेस रुटीनची सुरूवात करताना दिसली आहे. यानंतर ती डबल पुशअप करताना दिसते. त्यानंतर, मृणाल क्रॉलिंग रूटीन करताना दिसते. या व्हिडीओमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज देखील पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री मृणाल ठाकुर हिने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरची सुरुवात करणारी मृणाल ठाकुर हृतिक रोशनसोबत ‘सुपर थर्टी’ या चित्रपटात दिसली होती. याशिवाय ती फरहान अख्तरसोबत ‘तूफान’ या चित्रपटात दिसली होती. यानंतर तिचे ‘सीतारामम’ आणि गुमराह’ हे दोन्ही चित्रपटही प्रेक्षकांना खूप आवडले आहेत. मृणाल ठाकुर हिंदी चित्रपटसृष्टीत खूप प्रसिद्ध आहे. तर, सोशल मीडियावरही ती लोकप्रिय आहे. ती अनेकदा तिचे हॉट-बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
नुकताच मृणाल ठाकुरचा ‘गुमराह’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात ती एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकली आहे. चित्रपटातील आदित्य रॉय कपूर, मृणाल ठाकुर आणि रोनित रॉय यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे, तर आदित्य रॉयच्या दुहेरी भूमिकेचेही प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. ‘गुमराह’ हा चित्रपट साऊथच्या ‘थडम’ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.
संबंधित बातम्या