Shah Rukh Khan meets Acid Attack Survivors: बॉलिवूडचा ‘बादशाह’ अर्थात अभिनेता शाहरुख खान केवळ आपल्या अभिनयानेच नव्हे तर, आपल्या कृतींनी देखील प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहे. नुकतीच शाहरुख खानने अॅसिड अटॅकमधून बचावलेल्या लोकांची भेट घेतली. यावेळी त्यांने सगळ्यांसोबत फोटो देखील काढले. शाहरुखची ही भेट सगळ्यांसाठीच एक खास सरप्राईज होती. याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. चाहते देखील शाहरुखचे हे फोटो पाहून त्याचे तोंडभरून कौतुक करत आहेत.
बॉलिवूड किंग शाहरुख खानने २०२३मध्ये 'पठान' या चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर जोरदार कमबॅक केले. शाहरुख खान त्याच्या चित्रपटासोबतच वैयक्तिक आयुष्याबाबतही खूप चर्चेत असतो. दरम्यान, शाहरुख खानचे नवे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये शाहरुख खान अॅसिड अटॅक सर्व्हायव्हरसोबत दिसत आहे. शाहरुख खानचे हे फोटो येताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
शाहरुख खानने नुकताच कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यातील आयपीएल २०२३चा सामना पाहिला. यासाठी तो खास कोलकात्यात आला होता. यावेळी त्याने विराट कोहलीसोबतचा एक मनमोहक क्षणही शेअर केला. या भेटीदरम्यान त्यांनी अॅसिड हल्ल्यातील पीडितांचीही भेट घेतली. त्यांच्यासोबतचे शाहरुख खानचे फोटो एका फॅन पेजने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावेळी शाहरुख खानला भेटून अॅसिड हल्ल्यातील पीडितांनाही खूप आनंद झाला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर हा आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. तर, शाहरुखच्या या फोटोंचे चाहते देखील तोंडभरून कौतुक करत आहेत.
शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. 'पठान'नंतर शाहरुख खान आता अॅटलीच्या 'जवान' चित्रपटात झळकणार आहे. तो सध्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात नयनतारा, सुनील ग्रोव्हर आणि सान्या मल्होत्रा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय शाहरुख राजकुमार हिरानी यांच्या 'डंकी' या चित्रपटात तापसी पन्नूसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ‘डंकी’ हा चित्रपट २०२३च्या ख्रिसमस दरम्यान प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही चित्रपटांतून शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत.
संबंधित बातम्या