मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Majha Vegla: 'रंग माझा वेगळा'मध्ये दीपा-कार्तिकच्या संगीत सोहळ्यात अप्पू-शशांक

Rang Majha Vegla: 'रंग माझा वेगळा'मध्ये दीपा-कार्तिकच्या संगीत सोहळ्यात अप्पू-शशांक

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 10, 2023 12:25 PM IST

दीपा- कार्तिकच्या संगीत सोहळ्यात अप्पू-शशांक, सिंधू-राघव आणि मल्हार-स्वराज या जोड्या हटके परफॉर्मन्स वाढणार संगीत सोहळ्याची रंगत

रंग माझा वेगळा
रंग माझा वेगळा (HT)

छोट्या पडद्यावरील 'रंग माझा वेगळा' ही मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर आहे. मालिकेतील दीपा आणि कार्तिक पुन्हा एकदा सर्वांच्या साक्षीने विवाहबंधनात अडकणार आहेत. गैरसमज दूर झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने दोघांच्या नव्या आयुष्याची सुरुवात होतेय. मेहंदी आणि हळद थाटात पार पडल्यानंतर आता उत्सुकता आहे ती दीपा-कार्तिकच्या संगीत सोहळ्याची. या संगीत सोहळ्याला टीव्ही विश्वातील अनेक जोड्या हजेरी लावणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

इनामदार कुटुंबाच्या खास परफॉर्मन्स सोबतच स्टार प्रवाह परिवाराची उपस्थिती या संगीत सोहळ्याची रंगत आणखी वाढवणार आहे. ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अप्पू-शशांक आणि लग्नाची बेडी मालिकेतील सिंधू-राघवचा खास परफॉर्मन्स संगीत सोहळ्यात असेल. तर तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील मल्हार आणि स्वराजने खास गाणं सादर केलं आहे.
वाचा: पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खान की नोरा फतेही? कोणाला डेट करतोय आर्यन खान

दीपा कार्तिकचा संगीत सोहळ्यातला लूक लक्ष वेधणारा असेल. काळ्या रंगाच्या द्वेष करणाऱ्या सौंदर्याच्या मतपरिवर्तनानंतर संगीत सोहळ्यासाठी काळ्या रंगाला विशेष पसंती देण्यात येणार आहे. ब्लॅक इज ब्युटिफूल म्हणत खुद्द सौंदर्या इनामदारनेच दीपा-कार्तिकचा वेडिंग लूक डिझाईन केला आहे.

यापूर्वी आयेशा नावाच्या संकटाने दीपा-कार्तिकच्या आयुष्यात प्रवेश केला होता. दीपाला जीवे मारण्याचा प्रयत्न, कार्तिकला ब्लॅकमेल आणि श्वेताच्या बाळाला पळवून नेल्याप्रकरणी आयेशाला पोलिसांनी अटक केली होती. मात्र, तुरुंगात असताना चक्कर आल्याचं नाटक करून आयेशाने पोलिसांच्या तावडीतून पळ काढला. त्यानंतर ती वेश बदलून इनामदरा कुटुंबीयांच्या घरात काम करत होती. मात्र, तिच्या सततच्या गोंधळामुळे सगळ्यांनाच तिच्या संशय येऊ लागला आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये नवे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत.

IPL_Entry_Point

विभाग