मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: रणबीर कपूरला झालं तरी काय? चाहत्याचा फोन भिरकावल्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Ranbir Kapoor throws fans phone
Ranbir Kapoor throws fans phone

Viral Video: रणबीर कपूरला झालं तरी काय? चाहत्याचा फोन भिरकावल्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल

27 January 2023, 15:01 ISTHarshada Bhirvandekar

Ranbir Kapoor throws fans phone: रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर चक्क एका चाहत्याचा फोन फेकताना दिसला आहे.

Ranbir Kapoor throws fans phone: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर अनेक ठिकाणी हजेरी लावताना दिसत आहे. याच दरम्यान आता त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर चक्क एका चाहत्याचा फोन फेकून देताना दिसला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या व्हिडीओमध्ये एक चाहता रणबीरसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. मात्र, वारंवार प्रयत्न करूनही तो फोटो क्लिक करू शकत नाही. त्याचवेळी अचानक रणबीरला राग येतो आणि तो त्याचा फोन घेऊन मागे फेकून देतो. हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर युजर्स वेगवेगळे अंदाज लावत आहेत. या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, 'हाच यांचा खरा चेहरा आहे'. तर, आणखी एका यूजरने या व्हिडीओ 'फेक व्हिडीओ' म्हटले आहे. तर, काहींनी याला प्रमोशन फंडा असल्याचे देखील म्हटले आहे.

अनेकदा सेलिब्रिटी आपल्याच चाहत्यांवर नाराज होताना दिसतात. मात्र, कधीकधी घाईच्या वेळी देखील ते स्वतः थांबून चाहत्यांना सेल्फी आणि फोटो घेऊ देतात. मात्र, रणबीरचा हा व्हिडीओ पाहून अनेक लोक त्याच्यावर टीका करत आहे. मात्र, हा व्हिडीओ खरा होता की, प्रँक हे अद्याप समोर आलेले नाही. चाहता फोटो काढण्यासाठी सतत प्रयत्न करत असताना रणबीर त्याला हसून साथ देत होता. मात्र, अचानक रणबीरने त्याचा फोन मागून घेतला आणि थेट मागे भिरकावून दिला.

मात्र, ही एका फोनच्या ब्रँडची जाहिरात असल्याचे म्हटले जात आहे. रणबीर कपूरच्या एका मोबाईल फोनच्या जाहिराती दरम्यानचा हा व्हिडीओ असल्याचे चाहते म्हणत आहेत. तर, असे खोटे व्हिडीओ व्हायरल करून कलाकारांची बदनामी करू नका, असे देखील चाहते म्हणत आहेत.