Masaba Gupta Wedding: नीना गुप्ता यांच्या लेकीने थाटला नवा संसार; मसाबाने गुपचूप केलं दुसरं लग्न!
Masaba Gupta Wedding: बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी-फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता पुन्हा एकदा बोहल्यावर चढली आहे.
Masaba Gupta Wedding: बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी-फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता पुन्हा एकदा बोहल्यावर चढली आहे. बॉयफ्रेंड सत्यदीप मिश्रासोबत तिने लग्नगाठ बांधली आहे. अतिशय खाजगी सोहळ्यात हा विवाह पार पडला असून, याचे काही फोटो आता सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. या लग्न सोहळ्यात कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र सहभागी झाले होते. स्वतः मसाबाने लग्नाचे फोटो शेअर करत हि आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मसाबा गुप्ता हिने लग्न सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मसाबाचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. मसाबाच्या लग्नात तिचे वडील-प्रसिद्ध क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स देखील उपस्थित होते. या फोटोंमध्ये नाव विवाहित दाम्पत्यासह कुटुंबातील मंडळी दिसत आहेत. या फोटोंमध्ये मसाबा आणि सत्यदीप दोघेही गुलाबी रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहेत. मसाबा आणि सत्यदीप या दोघांच्या वयात तब्बल १७ वर्षांचा फरक आहे.
मसाबा गुप्ता ही नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स यांची मुलगी असून, प्रसिद्ध फॅशन डिझायनर देखील आहे. ‘हाऊस ऑफ मसाबा’ नावाचा तिचा एक अतिशय प्रसिद्ध ब्रँड आहे. याशिवाय मसाबा काही काळापूर्वी नेटफ्लिक्स शो 'मसाबा मसाबा'मध्ये देखील ती झळकली होती. सत्यदीप मिश्रासोबत हे मसाबाचे दुसरे लग्न आहे. याआधी मसाबाने २०१५मध्ये मधु मंटेनाशी लग्न केले होते. मात्र, लग्नाच्या ४ वर्षानंतरच दोघांचा घटस्फोट झाला.
नेटफ्लिक्स शो 'मसाबा मसाबा'च्या शूटिंगदरम्यान मसाबा आणि सत्यदीप मिश्रा यांची पहिली भेट झाली होती. अभिनेता सत्यदीप मिश्राचेही हे दुसरे लग्न आहे. सत्यदीपने २००९मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीसोबत लग्न केले होते. लग्नाच्या ४ वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. सत्यदीप मिश्राने 'नो वन किल्ड जेसिका' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो 'बॉम्बे वेलवेट', 'चिल्लर पार्टी', 'विक्रम वेधा' यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकला आहे.