मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Alia-Ranbir Daughter Name: कुर्रर्र.... आलिया आणि रणबीर कपूरच्या लेकीचं झालं बारसं! ‘हे’ आहे खास नाव

Alia-Ranbir Daughter Name: कुर्रर्र.... आलिया आणि रणबीर कपूरच्या लेकीचं झालं बारसं! ‘हे’ आहे खास नाव

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 25, 2022 10:12 AM IST

Alia-Ranbir Daughter Name: रणबीर आणि आलियाने त्यांच्या लेकीचं नाव जाहीर केलं आहे. एक पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या मुलीचं नाव सगळ्यांना सांगितलं आहे.

Ranbir-Alia
Ranbir-Alia

Alia-Ranbir Daughter Name: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर ही जोडी नुकतीच आई-बाबा झाली आहे. कपूर घराण्यात नुकतच राजकन्येचं आगमन झालं. आलिया भट्टने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. कपूर घराण्यातील नव्या पाहुणीची झलक बघण्यासाठी चाहते आतुर झाले आहे. मात्र, या सगळ्यातच आता रणबीर आणि आलियाने त्यांच्या लेकीचं नाव जाहीर केलं आहे. एक पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या मुलीचं नाव सगळ्यांना सांगितलं आहे.

अभिनेता रणबीर कपूर सोशल मीडियावर सक्रिय नसला, तरी आलिया मात्र आपल्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीरने त्यांच्या मुलीला उचलून घेतले आहे. तर, समोर भिंतीवर एका फुटबॉल टीमचे कपडे दिसतायत. यावर ‘राहा’ असे नाव लिहिले आहे. अर्थात आलिया आणि रणबीर यांच्या मुलीचे नाव ‘राहा’ असे ठेवण्यात आले आहे.

आजी नीतू कपूर यांनी हे सुंदर नाव निवडल्याची माहिती आलियाने दिली आहे. या पोस्टमधून आलिया भट्टने लेकीच्या नावाचा अर्थ देखील सांगितला आहे. ‘राहा म्हणजे दैवी मार्ग... स्वाहिली भाषेत याचा अर्थ आनंद, संस्कृत भाषेत राहा म्हणजे कुळ, बंगाली भाषेत याचा अर्थ विश्राम आणि अरबी भाषेत या नावाचा अर्थ आहे आनंद आणि स्वातंत्र्य... ज्या क्षणी आम्ही तिला पहिल्यांदा आमच्या हातात घेतलं, तेव्हा या सगळ्या गोष्टी आम्हाला अनुभवता आल्या. आमच्या आयुष्याला अर्थ दिल्याबद्दल राहा आम्ही तुझे आभारी आहोत', असे कॅप्शन तिने या पोस्टला दिले आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर लेकीचं नाव जाहीर करताच चाहत्यांनी शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. सोबतच आपल्या मुलीसाठी एक सुंदर नाव निवडल्याबद्दल नेटकऱ्यांनी आलिया आणि नीतू कपूर यांचं कौतुक देखील केलं आहे. ‘राहा’ या नावाचा अर्थ सांगितल्याने एक नवं नाव कळल्याचं देखील चाहते म्हणत आहेत. आता सगळ्यांना आलिया आणि रणबीरच्या लेकीचा चेहरा पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

WhatsApp channel